मतलब

Started by amoul, June 22, 2010, 02:35:02 PM

Previous topic - Next topic

amoul

क्वचित कुठे माणुसकीचे बंध पाळले जातात,
हमखास येथे माणुसकीचे बंध टाळले जातात.

काहीनां मान्यच नसतो आम्ही समूहात त्यांच्या,
अर्ज प्रवेशाचे आमचे परस्पर फेटाळले जातात.

मोल नाही येथे तुझ्या गुणांना वा शिलाला,
दमडीचे मोल ज्याकडे तेच सांभाळले जातात.

चाकरी प्रिय तुझी पण बरोबरी मान्य नाही,
केस दाढीचे भलत्याच हुजुराचे कुरवाळले जातात.

मोगर्याचा गंध फिका या लाचारीच्या बाजारात,
मतलब दडलेल्या हाताने तर निवडुंगही माळले जातात.

प्रतवारी होते इथे माणसांची वस्तूंपरी,
मापण्या औकात येथे कपडे न्याहाळले जातात.

तू मरतोस तेव्हा वाटते रोजचे तर आहे हे,
मतलबापुरतेच येथे आश्रुही गाळले जातात.

लक्षात ठेवा पुण्यपापाचा हिशेब यांना गौण आहे,
श्रीरामनवमीलाही इथे रावण ओवाळले जातात.

.................अमोल

bhupesh.samant


santoshi.world


PRASAD NADKARNI


gaurig