२४-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 24, 2022, 12:46:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०५.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे"दिनविशेष"


                                      "२४-मे–दिनविशेष"
                                     ------------------


अ) २४ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.

१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.

१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

=========================================

ब) २४ मे रोजी झालेले जन्म.
   ----------------------

१६८६: फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)

१८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)

१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)

१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)

१९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.

१९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.

१९७३: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.

=========================================

क) २४ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१५४३: पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)

१९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)

१९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)

१९९३: जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन. (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)

१९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)

१९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१)

२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.05.2022-मंगळवार.