मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, May 24, 2022, 12:53:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     मला आवडलेल्या चारोळ्या
                                         चारोळी क्रमांक-9
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --प्रस्तुत  चारोळीतून , हा  नवं -चारोळीकार , प्रेमात  त्याला  अनुभवास  आलेली  सुख -दुःखे  यांची  तुलना  करून  राहिला  आहे . तो  म्हणतोय , की  जेव्हा  माझे  तुझ्यावर  म्हणजे  त्याच्या  प्रेमिकेवर  प्रेम  जडलं , तेव्हा  त्याचे  रिक्त , पोकळ  जीवन  कसं  उत्साहाने , आगळ्या  अनुभूतीने  भरून  गेलं  होतं , भरून  वाहिलं  होतं . आतापर्यंत  उदास  असलेले  त्याचे  हृदय , हे  तिच्या  प्रेमाने , तिच्या  येण्याने , तिच्या  असण्याने  कसं  उल्हसित  झालं  होतं , किती  आनंदी  झालं  होतं , एखाद्या  फुलाप्रमाणे  कसं फुललं होतं,  खुललं  होतं , उमललं  होतं . तिने  त्याचे  सर्व  हृदय  व्यापून  टाकलं   होतं , ती  पोकळी  तिने  आपल्या  असण्याने , आपल्या  प्रेमाने  भरून  टाकली  होती . त्याचे  हृदय , मन  तिच्या  असण्याने , भर -भरून  गेलं  होतं . आता  त्यात  फक्त तिलाच  जागा  होती . अन्य  कुणासही  त्यात  आता  थारा  नव्हता .

     परंतु  दिवस  हे  तसेच  नसतात . कधी  सुखे  तर  कधी  दुःखेही  प्रचीतीस ,प्रत्ययास  येतात . तसंच  झालं . काही  कारणास्तव  या  नवं -चारोळीकारच्या  प्रेमात  दुरावा  निर्माण  झाला . त्या  दोघांच्या  प्रेमात  एक  दरी  निर्माण झाली . आणि  पाहता -पाहता  ते  दोघेही  विभक्त , वेगळे  झाले . ती  कुणा  दुसऱ्याची  झालेली  तो  स्वतःच्या  डोळ्यांनी  पहात  होता . परंतु  त्याला  इलाज  नव्हता . नशिबास  ,नियतीस  किंवा  समाजास  त्यांचे  हे  प्रेम  मंजूर  नसावे , कदाचित . असो , आता  त्याचे  ते  तेव्हाचे  तिच्या  प्रेमाने  व्याप्त  असे हृदय , कसे  भकास , रिक्त , खिन्न , उदास , मोकळे , पोकळ  भासू  लागले . ती  जाताच  हृदयात  भरलेले  तिचे  सारे  अनुभव  यांनी  एक  एक  करत  हृदयाचा  कप्पा  खाली  करण्यास , रिक्त  करण्यास  सुरुवात  केली . तरी  आठवणी , त्या  तर  येणारच . त्यांचा  तो  अधिकारच  आहे . सर्व  काही   दुरावले , पण  आठवणी  काही  जात  नव्हत्या . त्या  भक्कमपणे  त्याच्या  हृदयात  पाय  रोवून  राहिल्या होत्या . आता  हा  नवं -चारोळीकार , तिच्या  त्या  आठवणींवर  तर  जगत  आहे . ती  नाही , पण  त्याच्यासोबत  तिच्या  आठवणी  तर  आहेत . त्याला  फक्त  इतकंच  पुरेसं  आहे .

==================
हृदयातील  माझी  जागा
तुझ्या  येण्याने  भरून  गेली....
तू  गेल्यावर ती जागा
तुझ्या  आठवणीत  बुडून  राहिली....
==================

--नव-चारोळीकार
-----------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन मराठी.इन)
                      ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.05.2022-मंगळवार.