३१-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 31, 2022, 12:56:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.०५.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"


                                     "३१-मे–दिनविशेष"
                                    ------------------


अ) ३१ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.

१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.

१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.

१९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.

१९७०: पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मारले गेले आणि ५०,००० जण जखमी झाले.

१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

१९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.

=========================================

ब) ३१ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१६८३: सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १७५५)

१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

१९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २००१)

१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.

१९२८: क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००१)

१९३०: अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांचा जन्म.

१९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.

१९६६: श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा यांचा जन्म.

=========================================

क) ३१ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

४५५: रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.

१८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)

१९१०: वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)

१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)

१९९४: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)

२००२: लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२९)

२००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९१४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.05.2022-मंगळवार.