०२-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 02, 2022, 12:37:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.०६.२०२२-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                       "०२-जून-दिनविशेष"
                                      -------------------

-: दिनविशेष :-
२ जून
इटलीचा प्रजासत्ताक दिवस
=========================================

अ) महत्त्वाच्या घटना:
   -----------------
२०००
लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर
१९९९
भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.
१९७९
पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९५३
इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.
१९४९
दक्षिण अफ्रिकेने श्वेतवर्णीय सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
१८९७
आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले -
माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे!
१८९६
गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी 'रेडिओ'चे पेटंट घेतले.

=========================================

ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
    -----------------------------
१९७४
गाटा काम्स्की
गाटा काम्स्की – जन्माने रशियन असलेला अमेरिकन ग्रँडमास्टर, ५ वेळा अमेरिकन विजेता, [सर्वोच्च फिडे मानांकन २७६३ (जुलै २०१३)]
१९६५
मार्क वॉ
मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९६५
स्टीव्ह वॉ
१९८९ अ‍ॅशेस मालिका
स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९६३
आनंद अभ्यंकर – अभिनेते
(मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)
१९५६
मणीरत्‍नम
At the Museum of the Moving Image, New York (2015)
गोपाल रत्नम सुब्रमणियम तथा मणीरत्‍नम – तामिळ (व हिंदी) चित्रपटांचे दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्माते
१९५५
नंदन नीलेकणी
नंदन नीलेकणी – 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक
१९४३
इलयाराजा
इलयाराजा – गायक, गीतकार, वादक, संगीतसंयोजक आणि संगीतकार
१८४०
थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी
(मृत्यू: ११ जानेवारी १९२८)
१७३१
मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली 'फर्स्ट लेडी'
(मृत्यू: २२ मे १८०२)

=========================================

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    --------------------------
१९९२
डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
(जन्म: २१ एप्रिल १९३४)
१९९०
सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश तसेच अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते. त्यांनी 'शालीमार' या एका हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती.
(जन्म: ५ मार्च १९०८)
१९८८
राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि 'द ग्रेटेस्ट शो मॅन'
(जन्म: १४ डिसेंबर १९२४)
१९७५
देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.06.2022-गुरुवार.