०४-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 04, 2022, 12:56:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.०६.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                       "०४-जून-दिनविशेष"
                                      -------------------

-: दिनविशेष :-
४ जून
आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
International Day of Innocent Children Victims of Aggression
=========================================

अ) महत्त्वाच्या घटना:
    ----------------
२००१
१ जून २००१ रोजी राजवाड्यात झालेल्या हत्यासत्रानंतर नेपाळचे राजे ग्यानेंद्र गादीवर बसले.
१९९७
'इन्सॅट-२डी' या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९९४
गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर.
१९९४
वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ८ डावांत ७ शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९३
आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण
१९७९
घानामधे लष्करी उठाव
१९७०
टोंगाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४४
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी रोम जिंकले.
१८९६
हेन्‍री फोर्डने तयार केलेल्या पहिल्या स्वयंचलित वाहनाचे (Quadricycle) रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले. याला ४ हॉर्सपॉवरचे इंजिन आणि २ गिअर्स होते. या वाहनाला रिव्हर्स गिअर नव्हता.
१६७४
राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

=========================================

ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
   -----------------------------
१९७५
अँजेलिना जोली
अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती आणि मानवतावादी कार्यकर्ती, ऑस्कर पारितोषिक प्रमुख अभिनेत्री (२००९), ऑस्कर पारितोषिक सहाय्यक अभिनेत्री (२०००)
१९४७
अशोक सराफ
अशोक सराफ – विनोदी अभिनेता
१९४६
एस. पी. बालसुब्रम्हण्यम
श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक. पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) व पद्मविभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(मृत्यू: २५ सप्टेंबर २०२०)
१९३६
नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
१७३८
जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

=========================================

क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    --------------------------
१९४७
पंडित धर्मानंद कोसंबी
पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ञ
(जन्म: ९ आक्टोबर १८७६ - सांखवल, गोवा)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.06.2022-शनिवार.