" माफी "

Started by @गोविंदराज@, June 29, 2022, 04:55:44 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

तुझे शब्द सुमने हि मला काट्याहुनी टोचतात....
तुझ्या प्रेमरूपी मधाळ भावना हि का मला बोचतात..?

तुला समजून घेण्यात नेहमीच कमी पडलो...
इतका कसा बरं मी हरामी घडलो...?

तुझं सदैव योग्य असं वागणं होत...
माझंच मुळात चुकीचं ते जगणं होत...

काडीचीही मी सदैव माडी करत आलो...
खरंच का ग मी सतत लबाडी करत आलो ?

तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी वाकड घेत आलो...
माझ्याच का ग सरणाची मी लाकडं घेत आलो..?

चुकतंय हे कळून हि मी सुधारलो नाही...
पण मनापासून मी तुझ्यावर कधीच वधारलो नाही...

स्वतः चाच आता मला धिक्कार वाटतो आहे...
मीच माझा नजरेत आता मक्कार वाटतो आहे...

नीचपणाची भावना आता मनात घर करून बसली आहे...
नसा नसात आता स्वतः बदल हीन भावना वसली आहे...

खरंच मी तुझ्या लायक नव्हतोच कधी...
तू एक मॅगझीन तर मी पेपर ची  रद्दी...

मन आता स्वतःला माझं खातं आहे ...
आतल्या आत गुदमरून जात आहे ...

माफी वजा असा माझं बोलणं नव्हतं...
तत्वाला वगळून असं माझं चालणं होत..

"नेकी कर और दरिया मी डाल" म्हणायचं..
आणि आपणच आपल्या पावत्या वाटत फिरायचं...

सध्या मी अगदीच निशब्द झालोय...
काय करू ? काय नाही मी स्तब्ध झालोय...

पूर्णपणे मी आता गळून पडलोय...
राख माझी शिल्लक मी आता जळून पडलोय ...

चांगला वागलो नाही मी तुझ्याशी कदापि...
खरचं नकोस देऊ मला आता कसली माफी...

गोविंदराज
२९.०६.२०२२