बस्स इतकंच प्रेम

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 02, 2022, 10:05:31 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक..बस्स इतकंच प्रेम*

पावसाच्या सरींन पुन्हा
जखमेवर मीठ छिडकावं
तू आलीस असं वाटावं
अन थेंबानी पुन्हा मनाशी खेळावं
तुझ्या असून नसण्याचा विचार पुन्हा यावा
मनानं पुन्हा हेलकावणी घेत
पापण्यांच्या आड थेंब होऊन लपावं
अन मरणानं पुन्हा एकदा कवेत घ्यावं

बस्स इतकंच प्रेम तुझ्या अन माझ्यात उरलंय आता ....

असं होईल कधी वाटलचं नव्हतं
खरं तर तुझ माझं हृदय खेटलंच नव्हतं
जीवनाला दुःखात मोजतांना
प्रेमाला तू तिथं कधी सेट केलंच नव्हतं
कधी स्वप्नात तर कधी श्वासात तुला जोडणे
तुझ्यासाठी नात्यांना बेदखल करणे
फक्त एव्हडच मी करत गेलो
पुन्हा आयुष्यातून शून्य झालो
अशा अनेक गोष्टीचा तुला विसर झालायं
फक्त तूझ्यामूळ मुक्त फिरणारा भ्रमर निपचित पडलायं

बस्स इतकंच प्रेम तुझ्या अन माझ्यात उरलंय आता....

असो आता काहीच हरकत नाही
तुला यायचं की नाही आता तूच ठरवलं आहेस
दुःखाच्या पंगतीत नेऊन बसवलं आहेस
आता पाऊल वाटा ही ओळख विसरल्या असतील
त्या ही तूझ्या विचारानं विखुरल्या असतील
पाऊस आज आहे उद्या नाही बघ
उरलं सुरलं थडग आहे बघ तिथं कोपऱ्याला
एकटं निपचित पडलंय तुझ्या भेटीसाठी
तिथं गेल्यावर फक्त आसवांच रान पेरून जा
थोड्या जपून ठेवलेल्या आठवणी तिथेच कोरून जा

बस्स इतकंच प्रेम तुझ्या अन माझ्यात उरलंय आता ....

कविराज...अमोल......
मो.९६३७०४०९००.अहमदनगर