चारोळी पावसाची-क्रमांक-13-सर्व-शक्तिमान पाऊस

Started by Atul Kaviraje, July 05, 2022, 12:46:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                          क्रमांक-13
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आणी असा त्या क्षितीजाचा विचार चालू असता, कुठूनशी वार्याशी झुळूक येऊन तो  पावसाची नांदी घेऊन आला, आणी पहाता पहाता पाउस सुरु हि झाला, प्रथम थोडे थेंब आणी नंतर सरींवर सरी  बरसू लागल्या. मी पाहत होतेI, तो समोरल्या क्षितिजावरून असा पुढे इथपर्यंत आला होता, पावसाची सुरुवात तुम्ही कुठूनही  पहा, क्षितीजावरूनच होत असते,  तर असा तो तेथून आला, आणी अचानक मला जाणवले कि तो धुक्याचा दाट पट्टा आता हळू हळू विरळ होत चालला आहे, त्याचे घट्ट-पण, घनत्त्व हळू मिटत जाऊन ते विरत आहे. वातावरणाशी  एकरूप होत आहे, हवेत मिसळत आहे, आणी हलकेच नष्टही होत आहे, त्याचे नामो -निशाणही कुठे मला दिसेना, आणि मगाच पासूनचे ते हरवलेलं क्षितीज मला पुन्हा गवसले, त्या क्षितीजालाही  आता मोकळे झाल्यासारखे वाटले, पुन्हा ते  सर्व जगाकडे आपल्या अंदाजाने पाहू लागले, आणि नंतर त्याला कळले या धुक्याला परतवायला कारणीभूत हा पाउसच  आहे, त्याच्या आगमनाने ते धुके कुठच्या कुठे नाहीसे झाले आहे, मला त्याने मोकळे केले आहे, या पावसाचे आभार मानावे तेवढे थोडेच . तो महा-शक्तिमान आहे, सर्व-शक्तिमान आहे, त्याला काहीही  अशक्य नाही, तो काहीही करू शकतो.

  सर्व -शक्तिमान पाऊस
---------------------
सर्व -शक्तिमान आहे तो
त्याचे पडणे नुसते पडणे नाही
अमंगलाचे मंगल करतो तो
त्याला काहीही अशक्य नाही.
==============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.07.2022-मंगळवार.