तुझा सहवास

Started by Aaptish, July 14, 2022, 02:51:36 PM

Previous topic - Next topic

Aaptish

नको सोने, नको हिरे, नको मोगऱ्याचा वास
मला हवा फक्त आणि फक्त तुझा सहवास

नको काश्मीर, नको केरळ, नाही फिरण्याचा ध्यास
मला हवा फक्त तुझा सहवास

नको गाडी, नको बंगला, नाही कशाचा हव्यास
मला हवा फक्त तुझा सहवास

नको स्तुती, नको शाब्बासकी, नाही कशाची आस
मला हवा फक्त तुझा सहवास

तू माझा, मी तुझी हाच माझा आभास
मला हवा फक्त तुझा सहवास