चारोळी पावसाची-क्रमांक-19-आनंद-विभोर पर्ण-राई

Started by Atul Kaviraje, July 17, 2022, 12:48:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       चारोळी पावसाची
                                          क्रमांक-19
                                      ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आणी जसा तो पवन त्या पर्ण - राईतून बाहेर पडला, अगदी त्याच क्षणी पावसाचे आगमन झाले, त्याच्या थेंबाच्या टप-टप आवाजाने सारा आसमंत निनादू लागला. आणी पहाता पहाता सारे सारे कसे जलमय झाले, ओले -चिंब झाले, हिरवेगार झाले. तन मनात एक शिरशिरी भरू लागली, मन आनंदाने डोलू लागले, अगदी त्या समोरील राना, वना प्रमाणेच. एक अगदी खर कि जरी हि पर्ण - राई, झाडे, झुडे अचल असली तरी त्यानाही मन आहे, जरी ते बोलू शकले नाहीत तरी त्यांच्या हाव-भावातून , सळ-सळण्यातून  आपणास ते जाणवत असते. एक सजीवता, एक जिवंतपणा हि भरलेला आहे, त्यानाही हा पाउस आमच्या प्रमाणेच हवा आहे. त्यानाही जगण्यास तो तितकाच आवश्यक आहे, जेवढी गरज मानवालाही आहे. तर असा हा पाउस सर्वांची खबर घेणारा, सर्वाना एक पहाणारा, एक मनाने भावणारा.

  आनंद-विभोर पर्ण-राई
---------------------
आम्ही मानव आभारी आहोत
हि पर्ण - राई आभारी आहे
तुझे नित्य दर्शन व्हावे
म्हणून ती आजही उभी आहे.
==============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2022-रविवार.