चारोळी पावसाची-क्रमांक-20-पाउस व दंव-बिंदू

Started by Atul Kaviraje, July 18, 2022, 12:54:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     चारोळी पावसाची
                                        क्रमांक-20
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मित्रानो, हि आजची पहाट रम्य होती, अजून सूर्य प्राचीवर यायचा होता. अजूनही धुक्यात वेढलेली हि सृष्टी गुलाबी निजेच्याच अधीन होती, गुलाबी स्वप्नेच  पाहत होती. नेहमी प्रमाणेच वातावरणातून  थंड, गार, अश्या दंव-बिन्दुनी भूवर प्रवेश केला व आपली जागा घेतली. पाहावे तिकडे या दवाचे साम्राज्य दिसत होते. रस्ते, इमारती, झाडे, पाने फुले, छत, हिरवळ सर्व सर्व काही ओले झाले होते. एक निसर्गाचा चमत्कार या दव रुपात पाहण्यास मिळत होता. वर्षाचे १२ हि महिने हे दव बिंदू आपले काम हे पहाटेस येऊन नेकीने सच्चाईन करत असतात, त्यामध्ये कधीही खंड नाही, रोक नाही थाम नाही.  आपण मानवाने या दंव-बिन्दुंकडून एक शिकवण घ्यावयास हवी, कि रोजचे काम हे रोज झालेच पाहिजे. त्यात टंगळ मंगळ नाही, चाल-ढकल नाही. अन्यथा उशीर हा ठरलेलाच  आहे. तर या दंव बिन्दुनी पाउस येण्यापुर्वीच आपले स्थान या भूवर प्रस्थापित केले आहे,

     पाउस व दंव - बिंदू
    ------------------
दंव-बिंदू दिमाखात डोलत होते
पाना-फुलांना डोलवित होते
पर्जन्य बिंदूंची चाहूल लागता,
त्यांचे स्वागत करीत होते.

एक नेक काम करून जातात
एक शीतलता प्रदान करतात
रोज येऊन, मोत्यासम चमकून,
अल्प-काळीच विरून जातात.
===============


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.07.2022-सोमवार.