महामारीने घात केला तू पुन्हा आली नाही.

Started by Sanjay Makone, July 18, 2022, 03:37:52 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

खालील कविता हि कोरोना काळात जे जे कुणी माता,भगिनी, बंधू मृत पावले असतील त्या सर्वाना समर्पित करतो.

खालील कविते मध्ये कोरोना काळामध्ये (महामारी काळामध्ये) ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात जाण्याची वेळ आली आणि दवाखान्या मध्ये उपचार घेण्यासाठी जाताना त्याच्या मनाची काय अवस्ता होत होती. आपण पुन्हा घरी जिवंत येतो कि नाही याची त्यांना खात्री वाटत नव्हती.आणि घरातून जाताना त्याच्या मनाची अवस्ता,मनाची उलघाल अतिशय भावपूर्ण शब्दात मी माझ्या आईच्या रुपात या कवितेमध्ये मांडली आहे.



          महामारीने घात केला तू पुन्हा आली नाही.

महामारी आली दारी,आईची निघाली स्वारी
शब्द देवूनी गेली,"पोरा येईलरे माघारी."
एके दिवशी तुला आई,नेण्याची झाली घाई
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.

पदर ओला झाला तेव्हा,"म्हणाली आता येते"
भिडता नजर आपली,ते डोळे ओले होते.
उगीच बोलली, "डोळ्यामध्ये गेले माझ्या काही" 
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.

वाकून जेव्हा मस्तकी,तू लावि मातीचा टिळा
खरे सांगतो,तेव्हाच गेली अंगणाची कळा.
भिंतीही रडल्या जाताने, भेटली त्यांना नाही 
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.

हात सोडताना माझे,तू घट्ट धरले होते
थरारला जीव माझा,ते मौन बोलके होते.
तू डोळे भरूनी माझ्याकडे, एकटक पाही
महामारीने घात केला,तू पुन्हा आली नाही.


                               संजय माकोणे,अमळनेर,ता.नेवासा,जि.अहमदनगर
                                                   9623949907