मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-39

Started by Atul Kaviraje, July 21, 2022, 12:47:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                     चारोळी क्रमांक-39
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      --नवं  चारोळीकाराने  या  प्रस्तुत  चारोळीतून  आईची  अनेक  वैशिष्ट्ये  उद्बोधित  केली  आहेत . तो  म्हणतोय , जन्म  दिल्यापासून , ते  समज  येईपर्यंत , आईच  माझे  सर्व  काही  आहे . पालन -पोषण , शिक्षण , या  गोष्टी  पर्यायाने  आल्याचं . पण  हे  शिक्षण  देणारी , बोटात  खडू  धरून  पाटीवर  पहिले  ग  म  भ  न  अक्षर  काढणारी  ही  आईच  असते . घरातूनच  याचा  पाया घालणारी  , पायंडा  आपल्या  मुलास  देणारी  आईच  असते . शाळा , शिक्षक , गुरुजी  ही  नंतरची  गोष्ट , पण  शिक्षणाचे  मूळ  स्रोत  आईच  असते .

     पुढे  हा  चारोळीकार  असं  म्हणतो , की  घरात  कुणी , एखादे  भावंडं , बहीण  नसली  तर  ही  आईच  आपली  बहीण  होते . इतकंच  काय  ती  आपली  मैत्रीणही  होते . आपल्या  मुलाच्या  मनातली  सर्व  गुपिते , आवडी -निवडी , ती  चक्क  हेरते , त्याचे  मन  समजून   घेते , त्याला  मित्रत्वाची  वागणूक  देते , फक्त  एक  मैत्रीण  होऊनच . आणि  मग  तिचा  मुलगा , आपली  सुख -दुःखे , अनुभव, गुपिते  आपल्या  या  आई -रुपी  मैत्रीणीस  सांगण्यास  मुळीच  कचरत  नाही . कारण  आई  त्याचा  एक  विश्वास  असते , आणि  शेवट -पर्यंत  ती  तो  जपत , जतन  करीत  असते .

     आणि  सर्वात  महत्त्वाचे , म्हणजे  आपल्याला  जीवन  देणारी  आईचं  असते , जन्म  देणारी  आईचं  असते , आपल्याला  या  जगात  आणणारी  आईचं  असते . आणि  म्हणूनच  या  नवं -चारोळीकारास  असं  म्हणण्यास  बिलकुल  खंत वाटत  नाही , की  आपले  सर्वस्व , सर्व -काही  आईचं  असते , कारण  आज  तिच्यामुळेच  मी  हे  दिवस  पाहतोय , या  जगात  आलोय . तीच  माझे  जीवन  आहे , तीच  माझी  सर्व -काही  आहे , आईचं  माझा  देव  आहे . मी  देवाला  नाही  पाहिलंय , पण  माझ्या  आईत  मला  देवाचे  दर्शन  होतंय , आईतच  मी  देव  पाहिलाय .


जीवनातील पहिली शिक्षक
आणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच, कारण,
आपल्याला जीवन देणारी आईच असते.
===================

--नव-चारोळीकार
----------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी नेतृत्व.कॉम)
                       -------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2022-गुरुवार.