मराठी दिग्गज संगीतकार-श्रीनिवास विनायक खळे-सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 07:50:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मराठी दिग्गज संगीतकार
                                  "श्रीनिवास विनायक खळे"
                                 -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     श्रीनिवास विनायक खळे (३० एप्रिल, इ.स. १९२६; बडोदा, गुजरात - २ सप्टेंबर, इ.स. २०११) हे मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त 'बोलकी बाहुली', जिव्हाळा', 'पोरकी', 'पळसाला पाने तीन' यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते. तसेच लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी 'रामश्याम गुणगान' हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता. आज ऐकुया संत तुकाराम महाराज यांनी रचलेला एक सुप्रसिद्ध भक्ती-अभंग, जो संगीतकार श्री श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केला आहे.

                                "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी"
                               --------------------------

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान

तुळसी हार गळा कांसे पितांबर
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान

मकरकुंडले तळपती श्रवणी
मकरकुंडले तळपती श्रवणी
आ आ आ
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान

==============
संगीतकार - श्रीनिवास  खळे 
अभंग-रचना - संत  तुकाराम
गायिका - लता  मंगेशकर
==============

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सारेगामा मराठी)
                    ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.