दैवी,सुस्वर आवाजाची मराठी पार्श्वगायिका-आशा भोसले-धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:10:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          दैवी,सुस्वर आवाजाची मराठी पार्श्वगायिका
                                        "आशा भोसले"
                         -------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आशा भोसले (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले. त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे. आज ऐकुया, आशा भोसले यांच्या सुस्वरात गाजलेले एक सुप्रसिद्ध गीत- "धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना"

                                  "धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना"
                                 --------------------------

धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना

तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना

गायक-आशा भोसले,सुधीर फडके
-----------------------------

                          (साभार आणि सौजन्य-सारेगामा मराठी)
                                   (संदर्भ-एस.मुळे.कॉम)
                         -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.