भारतीय गानकोकिळा-लता मंगेशकर-मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

Started by Atul Kaviraje, August 11, 2022, 08:13:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   भारतीय गानकोकिळा
                                     "लता मंगेशकर"
                                  -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     लता मंगेशकर (हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या. आज ऐकुया, लता मंगेशकर यांच्या स्वरात, गीतकार सुरेश भट यांनी लिहिलेले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेले एक गाजलेले गीत.

                            "मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं"
                           ---------------------------------

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं

अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं
अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं

===================
गीत :  मेंदीच्या  पानावर
अल्बम : सुमधुर  गीते
गायिका : लता  मंगेशकर
संगीतकार : पंडित  हृदयनाथ मंगेशकर
गीतकार : सुरेश  भट
===================

                          (साभार आणि सौजन्य-सारेगामा मराठी)
                                 (संदर्भ-लैरिकस व्हर्स.इन)
                         -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2022-गुरुवार.