सावळा

Started by Vkulkarni, July 14, 2010, 10:40:08 AM

Previous topic - Next topic

Vkulkarni


सावळ्याची तनु सावळी
सावळीच सावली
का न मी झाले सावळी ?
राधा खंतावली

सावळ्याच्या मुरलीसवे
सुर ही सावळे
'काय माझे झाले असे हे'
राधेला ना कळे

गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी

पैलतीरी सावली सावळी
राधिके साद घाली
गेली वेडावुनी गोपिका
बासरी धुंदावली

प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहुल सावळी
जग राधे सावळा

विशाल

gaurig


Vkulkarni

धन्यवाद गौरी  :)

amoul


Vkulkarni

मन:पूर्वक आभार :-)

• » נєєт « • εﺓзस्वप्नातील राजकुमार मी♡♡♡

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......  :o :o :o :o :o :o

Vkulkarni

हुशार आहेस मित्रा  8)

Ruchi


Vkulkarni

धन्यवाद रुची !