तू नाही सुधारायचीस

Started by rudra, July 14, 2010, 04:00:26 PM

Previous topic - Next topic

rudra


तीनदा बेल वाजविल्याशिवाय दार उघडायचं नाही असा नियम आहे वाटतं ? एवढा कसला डोंगर उपशीत असतेस गं तू? माणसाने ऑफिसमधून दमून भागून यावं आणि दारावर पाच-पाच मिनिटं ताटकळत राहावं !
काय घर आहे की उकिरडा ? इकडे बघावं तर कपड्यांचा ढीग, तिकडे पाहावं तर खेळण्यांचा पसारा. वस्तू जागच्या जागी ठेवायचं काय वावडं आहे वाटतं ?
श्शी ! ह्या बिछान्यावर बसणं म्हणजे शिक्षाच मोठी. चादरीला मुताचा केवढा वास हा ! इथे-तिथे दुपटी वाळत टाकतेस, दुर्गंधी भरून राहणार नाही तर काय होणार ? कधी काळी त्या गादीला उन्हं तरी दाखव जरा. पण तुला काय फरक पडतो म्हणा ! बाराही महिने तुझं नाक चोंदलेलंच असतं. सुगंध-दुर्गंध तुला काय कळणार ?
अच्छा %% .... अख्खा दिवस हेच चाललेलं असतं नाही का ? जेव्हा पाहावं तेव्हा पोरांमध्येच गुरफटलेली दिसतेस. आमची आई आम्हां सात भावंडांना सांभाळून घर कसं चकचकीत ठेवायची. नाहीतर तू. इन-मीन दोन मुलांमध्ये घराची ही दुर्दशा. अख्खी क्रिकेटची टिम सांभाळतेस जणू !
हे काय ? पुन्हा सरबत ? तुला चांगलं ठाऊक आहे. माझा घसा बिघडलाय. आणलं आपलं थंडगार सरबत आणि टेकवलं हातावर. कधी तरी डोकं वापरत जा जरा. जा आता चहा घेऊन ये.... आणि नीट ऐक, यापुढे आल्या आल्या थंडगार सरबत आणत जाऊ नकोस माझ्यापुढे. आजारी पडणं परवडायचं नाही मला. तिकडे ऑफिसात श्वास घ्यायलाही उसंत नसते मला. पण तुझ्या टाळक्यात नाही शिरायचं ते. तुला तर आख्खं जग तुझ्याचसारखं `स्लो मोशन'मध्ये हलताना दिसतंय ना!

अनुवाद  हिरा जनार्दन....................................... 8)

gaurig