मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-51

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 12:55:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-51
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --प्रेम  चारोळीतून , आता  नायिकाही  आपलं  मत  मांडू  लागल्याचं  स्पष्ट  दिसत  आहे, हे  पाहून  आनंद  झाला . प्रस्तुत  प्रेम -चारोळीही अशीच आहे. नवं -चारोळीकार  या  प्रस्तुत  चारोळीतून , नायिकेचे , प्रेयसीचे  आपल्या  प्रेमी , प्रियकराबद्दल  काय  म्हणणे  आहे  सांगत  आहे . ती  म्हणतेय , की माझा  तथा-कथित  प्रियकर  हा  दुसऱ्याच  जगात  वावरत  असावा . माझ्याकडे  त्याचे लक्ष  नाही , माझ्या  प्रेमास  तो  प्रतिसाद  देत  नाहीय , काय  म्हणावे  याला  ? सारखा  कामाचा   विचार  करीत  असतो . त्याला  फक्त  त्याचे  कामच  माहित . मी  समोर  आले  तरी  तो  आतासा  मला  ओळखींनासा  झालाय .

     पुढे  हा  चारोळीकार  आपल्या  नायिकेचे , त्या  प्रेयसीचे  गाऱ्हाणे  उत्तमरीत्या  मांडीत  आहे . ती  प्रेमिका  आपल्या  प्रियकराशी विनंतीवजा  स्वरात  अर्चन  करीत  आहे , की  तुझे  आता  हे  फार  झाले . यासाठीच  का  माझ्यावर  प्रेम  केलेस , की  आता  सपशेल  माझ्याकडे  दुर्लक्ष  करीत  आहेस . जीवनात  फक्त  काम  एके  काम  करू  नकोस , इतरही  गोष्टी  आहेत  की  ज्यांचा  विचार  करावा  लागतो . तुझ्या  डोक्यातले  हे  कामाचे  विचार  थांबव. या  चलित , धावत्या  विचारांना  स्थगिती  दे , तुझ्या  विचाराच्या  वेगाला  आवर  घाल , आणि  मजकडे  पहा . माझे  काही  मागणे  आहे  तुझ्याकडे , तिथे  लक्ष  पूरव .

     तिच्या  बोलण्यात  अजीजी  नाहीय , लाचारी  नाही  तर  एक  प्रकारचा  निर्धार  आहे . ती  म्हणतेय , तुझे  तुझ्या  कामावर  अति -प्रेम  आहे , हे  मला  ठाऊक  आहे . ते  तू  सांभाळचं . पण  थोडं  माझ्याकडेही  पहा . ही  प्रेम -वेडी  किती  दिवसांपासून  तुला  भेटली  नाही . या  प्रेमाचा  काय  अर्थ  म्हणावा ? तुला  कामापासून  फुरसत  नसेल  तर  केव्हातरी  वेळ  मिळेल  तसं  मला  भेट . भेटून  बोलण्यात  जास्त  वेळ  तुला  घालवायचा  नसेल , तर  किमान -पक्षी  बाजूच्या  टपरीवर  एखादा  चहा  तरी  ढोसू . त्यासाठी  हौटेलात  जायची  काहीही  आवश्यकता  नाही . मी  तुला  आजवर  समजून  घेत  आलेय , तुही  मला  समजून  घे  ना  ? भेटून  थोडंसं  बोल , मजकडे  हसून  पहा , चार  प्रेमाचे  शब्द  ओठांतून  बाहेर  येऊ  दे . मला  वेड्या , एवढंच  पुरेसं  आहे . एवढं  केलंस  तरी  बस , मला  कळून  येईल  की  तुझं  माझ्यावर  आजही  प्रेम  आहे .

================
डोक्यातल्या तुझ्या चालत्या
विचारांना थांबा म्हणाव कधीतरी
वाटेत भेटून एक चहा आणि चार
प्रेमाचे शब्द बोलू केव्हातरी.
================

--नवं -चारोळीकार
-----------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ स्टेटस.एंटरप्रुनरशीप.कॉम)
                 ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.