लोकमत सखी-मीच ती-प्रसूतीप्रश्न-ब

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 08:17:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     >आरोग्य > प्रसूतीप्रश्न > गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा 'गरजेचंच' असतं? का काढावं लागतं गर्भाशय?

     ४) 'इंडोमेट्रिओसीस' नावाचा एक आजारामध्ये पेशंट ला सतत पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असतो तसेच गर्भाशयाशेजारी असणाऱ्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

     ५) कधीकधी योनीमार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू आणि पेशी शिथिल झाल्यामुळे गर्भाशय खाली घसरते याला prolapse असे म्हणतात. अशा वेळी लघवीची पिशवी सुद्धा गर्भाशय बरोबर खाली येते. अशा केसेस मध्ये स्त्रियांना एकावेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतुसंसर्ग होऊ शकतात. बाळंतपणाच्या वेळी बाळाचे वजन खूप जास्त असणे, अवघड डिलिव्हरी अशा केसेसमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. या स्त्रियांमध्ये योनिमार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनीमार्गाची जागा आवळून घेण्याची शस्त्रक्रिया केली जाते. या व्यतिरिक्त ही गर्भाशय काढण्याची काही कारणे असू शकतात. प्रत्येक पेशंटच्या वैद्यकीय अहवालांवर ते अवलंबून आहे.

     ही शस्त्रक्रिया कोणत्या पध्दतीने करतात?माझ्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल?

     - ही शस्त्रक्रिया मुख्यतः तीन पद्धतीने करता येते.

१) पोटावरून टाक्यांची शस्त्रक्रिया (abdominal hysterectomy)- या पद्धतीत ओटीपोटावर ९ ते १० सेमी चा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते. खूप मोठा फायब्रॉईड किंवा कॅन्सरची असल्यास ही पद्धत जास्त सोयीची आहे. तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल तर ही पद्धत उत्तम.

२) योनिमार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (vaginal hysterectomy)- या पद्धतीने शक्यतो prolapse असणाऱ्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते. या स्त्रियांना योनीमार्गात काही प्रमाणात टाके पडतात. काही वेळा prolapse नसतानाही योनिमार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया करता येते.

३) दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (laparoscopic hysterectomy)- ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे. या पद्धतीत पोटावर ४ अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनीमार्गातून बाहेर काढले जाते. ही पद्धत पेशंटसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. विशेष करून मधुमेह असलेल्या, स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात. त्या लगेच हालचाल, रोजची कामे सुरु करू शकतात. या पद्धतीत एकूणच पेशंटची बरे होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते.

     ही शस्त्रक्रिया टाळता येणं शक्य आहे का?

     - आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाने आणि संशोधनामुळे काही केसेसमध्ये आपण ही शस्त्रक्रिया टाळू शकतो. उदाहरणार्थ -

१) पेशंटचे वय कमी असेल आणि एखाद्दुसराच मोठा फायब्रॉईड असेल तर दुर्बिणीद्वारे फक्त फायब्रॉईड काढण्याची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

२) हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली समस्या LNG IUS या तांबी (CUT) सदृश साधनामुळे सोडवली जाऊ शकते. या उपचार पद्धतीत पेशंटला भूल देऊन आधी क्युरेटिंग केले जाते. आणि मग LNG IUS बसवली जाते. कॅन्सरची शक्यता दिसत असेल आणि गर्भपिशवीच्या आतला भाग गाठींमुळे ओबडधोबड असेल तर ही उपचार पद्धत वापरली जाऊ शकत नाही. या उपचार पद्धतीत रक्तस्त्राव कमी कमी होत जात पाळी थांबून जाते आणि पाच वर्ष थांबलेली राहते. याचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत पण पाळी पाच वर्षं थांबेल हे स्वीकारण्यासाठी पेशंटच्या मनाची तयारी लागते.

३) फायब्रॉईडच्या गाठींचा आकार कमी करण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. ती ३ ते ६ महिने देता येतात. काही वेळा औषधे थांबवल्यावर फायब्रॉईडच्या गाठी परत वाढू शकतात. या औषधांचे कधी कधी हलके दुष्परिणामही दिसू शकतात म्हणून ती विचारपूर्वक वापरावी लागतात. त्यामुळे ही उपचार पद्धती तरुण पेशंटसाठी जास्त योग्य आहे.

     कोणत्या प्रकारच्या केसेसमध्ये ही शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते हे समजून घेण्याची गरज आहे. या शस्त्रक्रियेला असलेले पर्याय आपण नंतर बघणारच आहोत.

--डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
(लेखिका पुणेस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
------------------------------------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकमत सखी-मीच ती)
                  ---------------------------------------------------

POSTED------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.