महाराष्ट्र टाइम्स-पोटदुखी-घरगुती उपाय

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 08:28:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     Home Remedies: काहीच समस्या नसतानाही केवळ 'या' एका कारणामुळे होऊ शकते प्रचंड पोटदुखी, हे घरगुती उपाय केल्यास मिळेल चुटकीसरशी आराम!

     home remedies for navel displacement or nabhi sarkane
Home Remedies.काहीच समस्या नसतानाही केवळ 'या' एका कारणामुळे होऊ शकते प्रचंड पोटदुखी, हे घरगुती उपाय केल्यास मिळेल चुटकीसरशी आराम!

     नाभी हा आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे. हे आपल्या शरीरात ऊर्जा प्रसारित करते आणि मानवी जीवनाचा विकास, परिसंचरण आणि नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावते. याला आपल्या शरीरा नंतर दुसरा मेंदू असेही म्हणतात. नाभीचा अर्थात बेंबीचा आपल्या पाचन तंत्राशीही जवळचा संबंध आहे, त्यामुळे नाभीतील कोणत्याही असंतुलनामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. कधी कधी चटकन वाकल्यामुळे, जड वस्तू उचलणे किंवा बद्धकोष्ठता आणि अतिसारामुळे नाभी तिच्या जागेवरून घसरते किंवा वाट चुकते. ज्यामुळे नाभीभोवती तीव्र वेदना सुरु होतात.

     तुम्हाला माहित असेलच की नाभी योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. पण जेव्हा बेंबी तिच्या जागेवरून सरकते तेव्हा त्या व्यक्तीला प्रचंड पोटदुखी, उलट्या, मळमळ यासारख्या समस्या येऊ लागतात. मुलांमध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे. काही घरगुती उपायांनी त्यावर सहज उपचार करता येतात. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर येथे सांगितलेले घरगुती उपाय तुम्हाला मदत करु शकतील.
बेंबीच्या आसपासच्या भागाची मालिश करा

     कधी कधी बेंबीच्या जागी तीक्ष्ण वेदना जाणवतात. जर असे कधी जाणवले तर नाभीच्या सभोवतालच्या भागाची मालिश केल्याने वेदनांपासून खूप आराम मिळतो. पण हे लक्षात ठेवा की मालिश स्वतःच करू नये. त्यापेक्षा तुम्ही ते एखाद्या तज्ञाकडून करून घ्याल तर चांगले होईल. या परिस्थितीत रुग्णाने जड वस्तू उचलणे कटाक्षाने टाळावे.

     उड्या मारणं फायद्याचं--

     नाभी सरकल्यावर आपचे वाड-वडील उड्या मारण्याचा सल्ला देतात. त्यांचा असा विश्वास आहे की उड्या मारल्याने नाभी तिच्या जागी पुन्हा येते. यासाठी तुम्ही सुमारे 2 फूट उंचीवरून 2 ते 3 वेळा उडी मारली पाहिजे. यावेळी लक्षात ठेवा की तुमचे सर्व वजन पायाच्या बोटांवर असावे. पण हा पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे त्यामुळे जास्त त्रास होत असल्यास स्वत:च्या मनाने असं काहीही उड्या मारणं टाळावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

     बडीशेप खा--

     जड वस्तू उचलताना अचानक नाभी तिच्या जागेवरून हलली तर ती स्थिती खूप वेदनादायक असते. जर ही परिस्थिती अचानक तुमच्यासोबत घडली तर बडीशेपचा घरगुती उपाय खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतो. यासाठी 10 ग्रॅम बडीशेप बारीक करून त्यात 50 ग्रॅम गूळ मिसळा. 2 ते 3 दिवस रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने नाभी तिच्या जागी परत येईल.

     नाभी आपल्या जागी आणण्यासाठी योग--

     खाली वाकताना आपली नाभी जेव्हा तिच्या जागेवरून घसरते, तेव्हा यामुळे होणारी तीव्र वेदना खूप त्रासदायक ठरते. नाभी सरकल्याच्या प्रसंगी योग देखील खूप फायदेशीर असतो. रुग्णाने हलासन, नौकासन आणि पवनमुक्तासन यासारखी योगासन करावीत. ही आसने नियमितपणे केल्याने नाभीच्या दुखण्याशी संबंधित समस्येपासून आराम मिळतो.

     मोहरीचं तेल नाभीसाठी खूप लाभदायक--

     नाभी तिच्या जागी परत आणण्यासाठी मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये तीन ते चार दिवस रिकाम्या पोटी सोडा. असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसेल आणि हळू हळू नाभी तिच्या जागी येऊ लागेल.

     नाभीतील वेदनेसाठी आवळा आणि गुळवेल--

     जर तुम्हाला कधी नाभी घसरण्याची समस्या होत असेल तर एक चमचा आवळा पावडर मध्ये लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट नाभीच्या सभोवती लावा. पेस्ट लावल्यानंतर काही वेळ झोपून राहा. ही पेस्ट दिवसातून दोनदा लावल्याने नाभी पुन्हा तिच्या जागी येईल.

     चहा पावडरच्या मदतीनेही नाभी येऊ शकते योग्य जागी--

     जेव्हाही नाभी भोवती वेदना होते तेव्हा आपल्याला काहीही समजत नाही. अशावेळी स्वयंपाकघरात ठेवलेली चहा पावडर तुमची समस्या सोडवू शकते. वास्तविक, नाभी सरकल्यानंतर लोकांना अनेकदा अतिसाराची समस्याही होते. अशा स्थितीत एक चमचे चहा पावडर एका ग्लासमध्ये उकळून ते पाणी गाळून घ्या आणि कोमट असताना प्या. यामुळे वेदना कमी होतील. त्याचप्रमाणे नाभी देखील तिच्या जागी येईल. हे सर्व नाभी सरकलेल्या समस्येसाठी नैसर्गिक उपाय आहेत आणि त्वरित परिणाम देणारे आहेत. आपण यापैकी कोणत्याही पद्धतीद्वारे समस्येचे निराकरण करण्यास सक्षम नसल्यास गंभीर समस्येसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे एखाद्या अंतर्गत समस्येमुळे झालेले असू शकते, जे केवळ वैद्यकीय चाचणीद्वारेच ओळखले जाऊ शकते आणि डॉक्टरांच्या मदतीनेच ही समस्या ठीक केली जाऊ शकते.

--प्रतीक्षा मोरे
------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.