लेख-पदवीधर

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:18:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          " लेख "
                                         ---------
   
मित्र/मैत्रिणींनो,

      "पदवी" या विषयावर एक सुंदर लेख वाचूया, आणि  या लेखातील आशय समजून घेऊया. या लेखाचे शीर्षक आहे- "पदवीधर"

     आज काल पदवीधर (ग्रॅजूएट) होणे म्हणजे  रोज सकाळी चहाबरोबर वर्तमानपत्र (पेपर) वाचण्याइतपत सर्वसाधारण झालं आहे. जसं दिवस संपल्यावर वर्तमानपत्राच नाविन्य संपून रद्दित जमा होतो, तशीच परिस्थिती पदवीधर लोकांची आहे. यांना नव्यान काही सुचत नाही. काही नोकरी मिळवण्यासाठी पदवीधर होतात . काहीनां पदवी मिळवली तरी समजत नाही आपण कशासाठी पदवीधर झालो !

     अनेक मित्रांना विचारलं सध्या काय करता तर उत्तर मिळालं एमपीएससी करतो, युपीएससी करतो. मला प्रश्न पडला ,एमपीएससी किंवा युपीएससी करतो म्हणजे नेमकं काय करतो! कारण माझ्या माहीतीप्रमाणे जगात एकाही विद्यापीठात हा कोर्स नाही, याचं प्रमाणपत्र कुठेही मिळत नाही. मग ही लोकं अशी उत्तरं का देतात? नीट विचार केला तर जगात सर्व जण रोज काहीतरी शिकत असतात, अभ्यास करत असतात. मग ते देखील एमपीएससी, युपीएससी च करतात ना ! हा काहींच वय या स्पर्धा परीक्षांच्या अटीत बसत नसेल पण ते रोज शिकत असतात .

     मग ते रोजच्या वर्तमानपत्रातून असेल, रोजच्या अनुभवातून असेल. हा ही लोकं फक्त स्व:त ला  मी एमपीएससी करतो किंवा युपीएससी करतो असं लेबल लावत नाहीत एवढाच फरक ! 

     अIज सर्वजण या पदांकडे उत्तम जा ब म्हणून पाहतात . या स्पर्धा परीक्षा पास होऊन ठराविक लोक अधिकारी बनतात पण आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्ष पणाला लावणा-या इतर तरूणांच काय? वयाच्या तीशी पर्यंत प्रत्येक तरुण पाहिलेलं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत असतो. हेच स्वप्न साकारण्यात त्याला अपयश आल्यावर त्याला किती वाइट वाटत असेल? काहीनां तर नैराश्य येत , जगण्यातील आनंद हरवतो. मी कोणालाही नाउमेद करण्याचा प्रयत्न करत नाही. ही वस्स्तुस्थिती आहे. मग एककलमी होऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापेक्षा इतर व्यवसाय, जाब करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास  केला तर कुठे चुकते? म्हणजे पुढे येणा-या यश-अपयशाला सामोरे जाण्याची, पचवण्याची ताकद तरी राहते. आणि प्रत्येकाने पदवीधर झाल्यानंतर एकच फिल्ड निवडीवी हे कंम्पलसरी नाहीये!

     मग मेंढराच्या कळपा प्रमाणे एकामागे एक जाण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं वेगळ स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला तर कुठे चुकते?

लेखक-अभिजीत हजारे.
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॉलेज कट्टा.कॉम बेस्ट)
                   -----------------------------------------------
                                             
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.