मला आवडलेला निबंध-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-ब

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:30:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "मला आवडलेला निबंध"
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "मला आवडलेला निबंध". या लेख मालिके-अंतर्गत आज वाचूया, एक महत्त्वाचा निबंध. या निबंधIचा विषय आहे- "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती"

विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती----
---------------------------------------

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजातील पहिले विद्यार्थी होते ज्यांनी एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये १८९७ मध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी १९०७ मध्ये मॅट्रिक ची परीक्षा पास केली आणि मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी मिळवली आणि जून १९१५ मध्ये एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये पी. एच. डी. मिळवली. त्यावेळी भारतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्याकडे इतकी उच्च पदवी होती. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी मधूनही पदव्या संपादन केल्या होत्या. त्यांनी एक शिक्षक आणि अकाउंटंट चे काम सुरु केले आणि सोबत स्वतःचा व्यवसाय हि सुरु केला. पण जेव्हा त्यांच्या ग्राहकांना समजले कि ते दलित आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांचा व्यवसाय बंद झाला.

     जेव्हा दलितांची मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना मदत करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी दलितांचा विकास करण्यास आणि त्यांना समान हक्क आणि न्याय मिळवून देण्यास मदत केली. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी दलतांसाठी सार्वजनिक पाणपोई सुरु करण्यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड मधील चवदार टाळ्याला सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे. त्यांनी दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश हि मिळवून दिला.

     दलितांसाठी लढण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठीही योगदान दिले. अर्थशास्त्र आणि राजनैतिक क्षेत्रातही त्यांनी खूप मोलाचे काम केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते. त्यांनी महिलांचा आणि मजुरांच्या हक्कांसाठी लढा दिला. मुंबई मधील गव्हर्नमेंट कायदा कॉलेज चे ते २ वर्ष प्रिन्सिपॉल हि होते. देशातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि दलितांना समान न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला.

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू--

     ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर १९९० मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या सन्मानार्थ अनेक इमारती, क्रीडांगणे, महाविद्यालये, आणि सार्वजनिक ठिकाण त्यांचे नाव देण्यात आले.

--लेखिका-पूजा शिंदे
------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीलेख.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.