लेखनाचा धागा-लष्कराच्या भाकऱ्या-ब

Started by Atul Kaviraje, August 15, 2022, 08:37:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "लेखनाचा धागा"
                                       ----------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, लेखनाचा धागा, या शीर्षका-अंतर्गत एक महत्त्वाचा विषय- "लष्कराच्या भाकऱ्या...."

     वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:--
१.ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२.मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३.जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !

     असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.

     आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.--
     एकदा त्यांच्या छापील अंकात "सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू" अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही "सेफ्टी" हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

     आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.--
     सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार 'करोना' असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने "कोरोना" असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो 'करोना' हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने 'क' च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच "को" च छापणे चालू आहे.

     गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा 'करोना' हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र 'को'चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील 'को'चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

     बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !

--कुमार
--------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम गुलमोहर मराठी)
              ------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2022-सोमवार.