घरगुती आजार व उपाय-फिट/आकडी

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 07:54:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "घरगुती आजार व उपाय"
                                 ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     घरगुती आजार व उपाय या  विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

                                फिट/आकडी----

       एखाद्या व्यक्तीला फीट/आकडी आली असता इतरांनी काय करावे...

1) गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या
2) पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि त्याला कुशीवर वळवा.
3) त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा.
4) दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
5) पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.

                   काय करू नये...

1) पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
2) पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
3) कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
4) फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.