नाकाची काळजी-नाकाचे रोग-ब

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 08:08:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नाकाची काळजी"
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     नाकाची काळजी या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

                                 नाकाचे रोग----

४. नाकांत व्रण होणें : हा क्षयी व अशक्त प्रकृतीमुळें होतो व तो हाडापर्यंत गेल्यानें नाक बसकें व विद्रूप होतें.

     उपचार:- पोटांत कॉडलिव्हर ऑईल वगैरे घेऊन प्रकृति सुधारावी व वर सांगितलेल्या धावनानें अगर आयडोर्फाम किंवा ल्याक्टिक आसिड लावून व्रणाचें स्थान शुद्ध करावें. व्रण जुनाट असल्यास शस्त्रानें खरडावा किंवा आंतील नासक्या हाडाचा तुकडा काढावा.

५. फिरंगोपदंशसंबंधीं नासारोग : लहान मुलास हा रोग (आईच्या संसर्गानें वगैरे) झाल्यास प्रथमावस्थेंत पटकुळ्या येऊन पडसें येतें व त्यामुळें श्वासोच्छासाच्या वेळीं मोठा आवाज, हीं लक्षणें होतात. यापुढील स्थितींत नाकपुडींत व्रण होतो व "गमा" नामक ग्रंथि होतात व त्यामुळें आंत चरत जाणारे खोल हाडीव्रण होऊन हाडें कुजून जातात व पू वाहून नाक खचतें व नंतर वसकें होतें, नंतर मधील पडदी झडते, टाळूस भोंक पडतें व नंतर नाकावरील मांस व त्वचा झडून गेल्यावर माणूस फार विद्रूप दिसतें. फार दिवस टिकणारा स्राव व हाडाची एक विशिष्ट दुर्गंधी व जुनाट पडशाप्रमाणें नाकाची अंतस्त्वचा सुजलेली नसणें आणि पूर्वी उपदंश झाल्याचा पुरावा मिळाल्यानें रोगनिदान होऊन उपचार करणें सोपें होतें.

      उपचार : पोटांत पोटॅशियम आयोडाईड हें औषध द्यावें; व त्याबरोबर क्किनाईन, सिंकोना, व नाना पारदभस्म प्रकारांपैकीं एखादा योग्य प्रकार योजून द्यावेत व पिनस रोगांत सांगितल्याप्रमाणें नाकावर धुण्याचे उपचार करावेत. कुजकें हाड शस्त्रक्रियेनें नाकपुड्याच्या पुढील अगर मागील छिद्रांतून काढून टाकावें.

६. लेंकरांनां सांसर्गिक फिरंगोपदंश रोग झाल्यास पोटांत कांहीं महिने ग्रे पावडर हें औषध सूक्ष्म प्रमाणांत देऊन नंतर पोट्याशियम आयोडाईड दिल्यानें आश्चर्यकारक गुण येतो. नंतर कॉडलिव्हर आईल द्यावें.

७. ल्यूपस नामक त्वग्रोग नाकाबाहेर होतो. तो कधीं नाकाच्या पडदीस होऊन तेथें छिद्र पडल्यानें स्राव सुरू होतो. तेथील जागा लाल होऊन तीवर कोंडा व खपल्या जमतात, व त्या काढल्या तर त्यांखालीं मऊ व्रण दिसतो.

     उपचार : पोटांत कॉडलिव्हर आईल व सोमल हीं पौष्टिक औषधें देऊन रोगनाश करणारीं ल्याकटिक असिडें वगैरे औषधें लावावीं अगर शस्त्रानें खरडावें अगर "क्ष" किरणांचा उपयोग करावा.

८. नासाश्मरी : मुतखड्याप्रमाणें चुन्याच्या फॉस्फेटचें कीट नाकांत जमून खडा बनतो व त्यामुळे शेंबूड स्राव, नाक चोंदणें हीं लक्षणें होतात. निदान करतांना अस्थिग्रंथि अगर क्यान्सर आहे कीं काय असा घोंटाळा होतो.

     उपचार : खडा चिमट्यानें ओढून काढावा. खडा मोठा असल्यास प्रथम तो फोडण्याचें शस्त्र असतें त्यानें प्रथम बारीक करून काढावा. आगंतुक पदार्थ आंत शिरल्यासहि वरीलच उपचार उपयोगी आहेत.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.