नखांची काळजी-मॅनिक्युअर

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 08:10:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नखांची काळजी"
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     नखांची काळजी या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

                           नखांची काळजी----

         घरी मॅनिक्युअर करताना झालेल्या चुका अशा लपवा----

१. घरच्या घरीच मॅनिक्युअर केल्यानंतर नेलपॉलिश लावताना अनेकदा नखांसंबंधी समस्या उद्भवतात. पार्लरमध्ये केली जाणारी पद्धत माहीत नसल्याने या अडचणी निर्माण होतात. अशावेळी वारंवार त्याच त्या चुका करण्यापेक्षा वेळीच उपाय समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

२. कुरतडलेली नखे : नखांच्या कुरतडलेल्या भागांवर व्हाईट नेल बफर लावावे व तो भाग मुलायम करावा. त्यावर बेस कोट व नंतर अजून एक कोट व सर्वात शेवटी फायनल थिन कोट लावावा. याचा परिणाम एक आठवड्यापर्यंत राहातो. याचबरोबर कुरतडलेली नखे लपविण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे, स्पार्कली नेल पॉलीश वापरावे.

३. तुटलेली नखे : तुटलेल्या नखांना नेल बॅन्डेड लावावे. पेपर टॉवेल किंवा टी बॅगच्या कव्हरचा छोटासा तुकडा तुटलेल्या नखावर लावावा. त्यावर काळजीपूर्वक नेल ग्लो चिकटवावा. पातळी एकसारखर वाटत नसेल तर, त्यावर सॉफ्ट बफर लावावे.

४. शिट मार्क्स : अनेक महिलांना ही समस्या जाणवते. रात्री उशिरा नेल पॉलिश लावले व ते नीट वाळू दिले नाही तर नखांवर हमखास शिट मार्क्स येतात. अशावेळी फिलर कोट द्यावा, मग अजून एक कोट देऊन सर्वात शेवटी थिन कोट लावावा.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.