ओठांची काळजी-ओठांच्या नकळत वाढणार्‍या समस्या

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 08:12:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "ओठांची काळजी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     ओठांची काळजी या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

           ओठांवरून ओळखा शरीरात नकळत वाढणार्‍या समस्या----

१. पाऊट देऊन फोटो किंवा सेल्फी काढला तर त्यावर तुम्हांला पटापट लाईक्स मिळतात. पण तोच पाऊट म्हणजेच ओठ तुमच्या आरोग्याबाबत अनेक संकेत देतात.

२. सुकलेले आणि निस्तेज ओठ शरीरातील काही समस्यांबाबत तुम्हांला माहिती जाणीव करून देत असते.

३. फाटलेले ओठ – तुमच्या आहारात पोषणद्रव्यांची कमतरता असल्यास त्याचा परिणाम ओठांवर दिसून येतो. अचानक ओठ सुकलेले आणि फाटलेले आढळल्यास, वेदना जाणवल्यास शरीरामध्ये झिंक, आयर्न, व्हिटॅमिन बी 3 आणि बी 6 यांची कमतरता असण्याची शक्यता आहे.

४. पुळी – सर्दीच्या त्रासानंतर अनेकांच्या ओठांवर वेदनादायी पुळी आढळते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे ते एक लक्षण आहे.

५. सुकलेले ओठ – केवळ वातावरणातील बदलांमुळे ओठ सुकतात असे नाही तर शरीर डीहायड्रेट झाल्यास म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओठ सुकतात.

६. फोड – काहींच्या ओठांवर वरचेवर फोड येण्याची समस्या आढळते. अतिप्रमाणात कष्ट करणार्‍यांमध्ये हा त्रास आढळून येतो. ओरल कॅन्सरमध्ये ओठांवर कोठेही फोड आढळून येऊ शकतो. त्याचे निदान सुरवातीच्या टप्प्यावर करण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७. सूजलेले ओठ – मुलींचे ओठ सुजण्यामागे लीप बाम किंवा लिपस्टिक असू शकते. अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनमुळे ओठांवर सूज येऊ शकते. काही वेळेस खाण्यामध्ये चूकीचे किंवा त्रासदायक पदार्थ आल्यास रिअ‍ॅक्शन दिसून येते.

८. ओठांच्या टोकांवर चिर पडणे – झोपेत लाळ गळण्याची समस्या असल्यास ओठांच्या टोकांशी क्रॅक्स / चिर पडण्याची शक्यता असते. सतत बाहेर पडणार्‍या लाळेमुळे ओठांच्या टोकाशी यिस्ट इंफेक्शन वाढते. त्याचे प्रमाण वाढल्यास चिर पडते.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.