रिलेशनशिप-पुरुषांसाठी आरोग्य संबंधी टिप्स

Started by Atul Kaviraje, August 16, 2022, 08:13:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रिलेशनशिप"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     रिलेशनशिप या विषया-अंतर्गत आज वाचूया पुढील लेख-

        पुरुषांसाठी आरोग्य संबंधी टिप्स- (Health tips for men)----

     आजकाल सगळेच जण आपल्या शारीरिक तंदुरुस्ती साठी संवेदनशील असतात आणि सगळ्यांनाच वाटते आपले शरीर एकदम तंदुरुस्त आणि योग्य शरीररष्टी असावी आणि यासाठी ते खूप प्रयत्न करतात. काहीजण खुप सडपातळ असतात आणि त्यांना आपले वजन वाढवायचे असते तर काहींचे वजन खूप जास्त असते, त्यांना ते वाढलेले वजन कमी करायचे असते. अजून वेगवेगळे प्रकारचे अंतर पुरुषांच्या शरीरामधे असतात उदा. रंग, रूप, कोणी उंच असतो, कोणी मध्यम उंचीचा असतो, तर कोणी बुटका असतो.

     अयोग्य शरीराची काही कारणे आहेत. अनुचित खानपान म्हणजेच काहीही खाणे, अनियमित खानपाणामुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम तसेच विविध आजार होतात, यामुळे कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. जसे जंक फूड च्या नियमित सेवनामुळे शुक्राणूंची गुणवत्ते मध्ये कमतरता येते.

                     योग्य आहार----

     जर आपल्याला स्वतःला तंदुरुस्थ ठेवायचे असेल तर कमीत कमी २-३ केळी दुधा सोबत खात जा, आपल्याला फायदा होईल. असे केल्या मुळे  हृद्य संबंधी आजार कमी होतात. Packing Foods खाल्यामुळे आजार होऊ शकतात कारण यामध्ये अशा Metals चा वापर केला जातो जे आरोग्यासाठी चांगले नसतात. यामुळे अशा पदार्थांचा सेवन करू नका. ताजे पदार्थ खात जा. नेहमी व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल व आपण तंदुरुस्त रहाल.

     कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ हे चवदार असतात पण याचे सेवन अधून मधून करा. नेहमी चांगल्या तेलाचा वापर करा. जाडेपणा मुळे पुरुषांच्या लैंगिक सामर्थ्य वर परिणाम होतो. म्हणून जास्त वजन वाढू देऊ नका. त्यासाठी कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ अशा पदार्थांचे सेवन एकदम कमी करा. जर आपल्याला व्यायामशाळेत जायला वेळ मिळत नसेल तर घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ऑफीस, शाळा, कॉलेज, बाजारात जाताना चालत जाण्याचा प्रयत्न करा, लिफ्ट चा वापर टाळा, जिन्याचा वापर करा, याचा आपल्याला चांगला फायदा होईल.

     आपल्या खाण्यामध्ये ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा. सकाळी नाश्ता जरूर करावा. सलाड आणि अंकुरित कडधान्यांचा जेवणात वापर करावा आणि जेवताना चपाती आणि भात यांचे एकाचवेळी सेवन करू नका थोड्या अंतराने करा म्हणजेच सकाळी चपाती खा व दुपारी भात खा. आपल्या शरीराची मालिश जरूर करा. रात्री लवकर झोपा व सकाळी लवकर उठून व्यायाम करा तसेच चालण्याचा व्यायाम करा.

--प्राची म्हात्रे
-----------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हेल्थ.मराठीवारसा.कॉम)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2022-मंगळवार.