मंत्र आरोग्याचा-कोरोना : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अशी वाढवा

Started by Atul Kaviraje, August 17, 2022, 08:43:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मंत्र आरोग्याचा"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मंत्र आरोग्याचा", या आरोग्य-मथळया-अंतर्गत, एक महत्त्वाचा आरोग्य लेख.- "कोरोना"

कोरोना : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अशी वाढवा
kids safety in corona
----------------------------------------------------

     कोरोनाचा कहर अजून संपलेला नाही. अशात लहान मुलांची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे कारण अजूनही त्यांना लस देण्यात आलेली नाही. तज्ञांप्रमाणे परदेशी मुलांच्या तुलनेत भारतातील मुलांची रोगप्रतिकार क्षमता कितीतरी पटीने जास्त आहे. तरी मुलांमधील रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. त्यात घरी आल्यावर तोंड, हात पाय धुणं अनिवार्य असायला हवं.घरात जोडे चप्पल नको तसंच उन्हाळ्यात घरी येऊन अंघोळ करण्याचा सल्ला दिला जात आहे.

                 या शिवाय या गोष्टींकडे लक्ष द्यावं--

--घरात आजारी लोक आणि लहान मुलांना दूर ठेवा.
--लहान मुलांना जंक फुडपासून दूर ठेवा आणि त्यापासून होणाऱ्या तोट्याची कल्पना द्या.
मुलांचं लसीकरण वेळेवर व्हायला हवं. हल्ली इन्फ्लुएन्झाचीही लस देतात. त्यामुळे कोव्हिडपासून बचाव होऊ शकतो.
--मुलांना मास्क घालण्याची सवय लावा.
--मुलांना आता लगेच शाळेत पाठवू नका.
--भारतातल्या मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता दिसते. त्यामुळे ज्या कुटुंबात अंडे खाल्ले जातात त्यांनी मुलांनाही अंडं द्यावं.
--वरण आणि सोयाबीन हे प्रथिनांचे स्रोत आहेत.
--मुलांना दूध पिण्याची आणि पनीर खाण्याची सवय लावा.
--नाचणी, मका, चणे, सत्तू यांचं सूप किंवा हलवा तयार करून लहान मुलांना द्या आणि लहान मुलांना याचा पराठा द्या.
--व्हिटॅमिन सी साठी लिंबू-पाणी द्या आणि फळं खाऊ घाला. जे व्हिटॅमिनचे स्रोत आहेत ते मुलांना द्यायला हवेत.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेब दुनिया.कॉम)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2022-बुधवार.