ओंजळ

Started by mkapale, August 19, 2022, 08:35:44 AM

Previous topic - Next topic

mkapale

आहे का हो ओंजळ...सुख सामावून घेणारी
जीवन तुम्हाला देतय ते देणं..स्वीकारून घेणारी

आयुष्य इतकं मोठं आहे , सदा काहीतरी देत असतं
आपलं मन का नेहेमी, उणिवांना धरून रडत असतं?

जे आज मिळालं तेही कधीतरी... स्वप्नागतच होतं
तरीही का बरं पुढे काय अश्या प्रश्नातच भविष्य असतं?

जीवन रहस्यमय चलचित्रासारखं आहे म्हणून छान आहे
सगळं माहित असावं या अट्टाहासात का सगळं फसतं?

करा आयुष्यावर प्रेम आणि जगा नदीच्या धारेसारखं
ओंजळभर क्षणांच्या मिळकतीतच जीवनाचं सोनं असतं!!!