एक धागा ठेवशील का

Started by mkapale, August 19, 2022, 08:54:06 AM

Previous topic - Next topic

mkapale

आपल्या नात्याचा एक धागा मागे रेंगाळू देशील का
काळाच्या पल्याड आयुष्य दडपल्यावर दिसेल असा
कधी कधी त्याला ओढून त्या आठवणी जगता येतील
ज्याचा आधार घेत कधी, दिवस पुढे ढकलता येईल असा

ओशाळ झालं मन कधी, की अलगद त्याकडे नजर जाईल
त्याच्या असण्याने जणू तुझा, हळुवार सहवास लाभेल असा
आठवणी तर आहेतच पण वाटतं त्याहून काही जास्त असावं
जसं डोळे भरून देवाला पाहिलं तरी वळून केलेलं नमन तसा

नात्यांचे असे कई धागे आहेत विखरलेले इकडे तिकडे
जुने अन नवे जुळत गेले, आयुष्याचा डाव मांडला जसा
नाजूक भावना तर सगळ्यांच्याच मुळाशी होत्या.. तरीही
तुझ्याच धाग्यात मायेचा, आहे ओलावा का जास्तसा