मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-57

Started by Atul Kaviraje, August 26, 2022, 01:03:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-57
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराने  या  प्रस्तुत  चारोळीतून  आपला  अत्यंत  साधेपणा  जपला  आहे . पण  आपल्या  आईची  महती , महानता  वदताना , लिहिताना  तो  बिलकुल  कंजूषपणा  करीत  नाहीय . अगदी  सढळपणे , सिद्ध -हस्तपणे  त्याने  ही  आईवरली  चारोळी  लिहिली  आहे . तो  म्हणतोय , बऱ्याच  लेखकांनी  आपल्या  साहित्यातून , बऱ्याच  मान्यवर  कवींनी  आपल्या  कवितांतून  आपल्या  आईची  महती  लिहिली  आहे , गायिली  आहे . पण  मी  ठरलो  एक  लहानसा  माणूस . माझे  तर  कुठेही  नाव  नाही . मला  तर  कोणी  ओळखतंही  नाही . पण  माझी  माझ्या  आईवरली  श्रद्धा  ही  तसूभरही  ढळलेली  नाही . मी  माझ्या  आईचा  मातृ-भक्त  आहे , परम-भक्त  आहे . आईने  आजवर  माझ्यासाठी  जे  काही  केले  ते  माझ्यासाठी  न विसरता  येण्यासारखेच  आहे .

     पुढे  हा  नवं-चारोळीकार  लिहितोय , आई  तू  नसतीस  तर  माझे  हाल  कुणालाही  पाहवले  नसते . तू  होतीस  म्हणून  मी  आज  आहे . तू  माझ्यापाठी  लहानपणापासूनच  खंबीरपणे , एखाद्या   पहाडाप्रमाणे  उभी  होतीस . प्रत्येक  संकटकाळी  तू  माझी  बाजू  घेतलीस , मला  सहारा  दिलास , मला  आसरा  दिलास , आश्रय  दिलास , मला  धीर  दिलास , मला  उत्तम  आयुष्य  जगायला  शिकवलंस . अनेक  संकटे  सोसून  तू  मला  लहानाचे  मोठे  केलेस , जगण्यास  लायक  केलेस . जे  कुणालाही  शक्य  नाही , अशी  अशक्यप्राय  गोष्ट  आई  तू  करून  दाखवलीस .

     पुढे  तर  या  चारोळीकाराने  कळसच  गाठला  आहे . तो  म्हणतोय , आई  तू  खरोखरच  ग्रेट  आहेस , महान  आहेस , देवाहूनही  श्रेष्ठ  आहेस . तू  तळपत्या  उन्हामधली  माझी  सावली  आहेस . प्रखर  रणरणत्या  उन्हात , चटके  बसत  असता , तूच  माझी  शीत , सुखद , थंड  सावली  होऊन  माझा  प्रतिपाळ  केलास , मला  धीर  दिलास , माझे  संरक्षण  केलेस .आई  तू  मुसळधार  पडणाऱ्या  पावसात  माझी  छत्री  बनून , माझा  पावसापासून  बचाव  केलास , स्वतः  भिजलीस  पण  मला  मात्र  पूर्ण  कोरडे  ठेवलेस . पावसाच्या  पाण्याचा  स्पर्शही  माझ्या  अंगाला , शरीराला  तू  होऊ  दिला  नाहीस . आई  तू  थंडीच्या  दिवसात  तुझ्या  मायेची  उबदार  शाल  पांघरून  तुझ्या  कुशीत  घेतलेस . ती  मायेची  उबदार  कूस , तिच्यातील  आपलेपणा , तिच्यातील  उब , तिच्यातील  गर्मी  मला  आजही  त्या  क्षणाची  आठवण  करून  देते . अजून  मी  तुझ्या  महानतेचे , मोठेपणाचे  किती  वर्णन   करावे . माझी  लेखणीही , वहीचे  पानही  तोकडे  पडू  लागले  आहे . आई  तू  खरोखरच  महान  आहेस , तू  माझी  देव  आहेस , तूच  माझी  देवी  आहेस . आई  तुला  प्राप्त  करून  मी  धन्य  झालो . जन्मोजन्मी  तूच  माझी  आई  व्हावीस , अशीच  त्या  ईश्वर -चरणी  माझी  मनापासून  प्रार्थना  आहे .

=============
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल...
=============

--नवं-चारोळीकार
--आदित्य शाम झिनागे
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-मराठी नेतृत्व.कॉम)
                      -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2022-शुक्रवार.