कविता पावसाच्या-कविता-अडोतीसवी-मनातला पाऊस

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 01:19:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "कविता पावसाच्या"
                                     कविता-अडोतीसवी 
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     पावसावरच्या सुंदर कविता-paus kavita in marathi वाचायच्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. इथे तुम्हाला नवीन सुंदर पाऊस कविता वाचायला मिळतील.  ह्या लेखाद्वारे सुंदर rain poem in marathi म्हणजे पावसावरील कवितांचा संग्रह उपलब्ध करून दिला आहे. मला आशा आहे तुम्हाला ह्या पाऊस  मराठी कविता paus marathi kavita नक्की आवडतील

                                    "मनातला पाऊस"
                                   -----------------

क्षितिजाकाठी तो दिसता
खिडकीशी मीही थबकतो
निळ्याशार अंबरी जमल्या
घन निळ्या मित्रांना पाहतो .....II

पावसाच्या दूतांना पाहुनी
या या मित्र हो ,मी विनवितो
घेत नाही मग आढेवेढे तो
आणि मनमुराद कोसळतो ....||

मित्र असे मोकळे असावे
आत-बाहेर काही नसावे
देणे पावसापरी जमावे
जीवनी सुख होऊनी यावे ....||

मनातला पाऊस मनातच बरा
बाहेर आला तर डोळे ओले होतील
पुन्हा एकदा मग विनाकारण ते
जुन्या आठवणींना उजाळा देतील II

शांत जरी तो बाहेरून साऱ्यासाठी
आतल्या आत आजही तो बरसतो
वाट पाहतो भेटीसाठी तो अजुनही
सारे काही मनी साठवून तरसतो II

मनातील त्या पावसाला आवडते
चिंबचिंब भिजवायला हे तनमन
ऐकता त्याचे दुःख होतात भावूक
ढाळून दोन अश्रू सोडतात सारेजण II

म्हणून मनातील तो पाऊस आजही
तसाच अव्यक्त कोपऱ्यात दडलाय
घेईल समजून कोणीतरी या आशेवर
तो आज धो धो कोसळुन पडलाय II

त्याला न ठाव काय आता होणार आहे
तरीही तो साऱ्यांच्या मनी आनंद भरतो
कुणी होवो अथवा न होवो आपले तरीही
केल्या उपकारांची तो जाणीव धरतो II

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी माहिती.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.