IIश्री गणेशाय नमःII-श्री गणेश चतुर्थी-हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 11:32:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    IIश्री गणेशाय नमःII
                                      "श्री गणेश चतुर्थी"
                                   -------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-३१.०८.२०२२-बुधवार, गणेश चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

              गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो,
कोणतेही संकट आपल्यावर न येवो.
आपली भरभराट होवो हीच प्रार्थना
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
–गणपती बाप्पा मोरया !

अवघी विघ्न हरण्या आलासी तू,
मोरया बाप्पा मोरया
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

मंगलमूर्ती, वरदविनायक, तूच विघ्नहर्ता आणि तूच पालनकर्ता
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

बाप्पाच्या असण्याने हरपते तनमन, तूच आहेस आमचा विघ्नहर्ता
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

आपल्या दु: खाचा नाश करा आपल्या आनंदात वाढ करा
आणि आपल्या सभोवताली चांगुलपणा निर्माण करा !
--गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवान गणेश आपल्या घरात भरभराट
आणि संपत्ती भरुन देतील ही मनापासून इच्छा आहे
–गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

देवावर श्रद्धा ठेव, संपूर्ण जग देवामध्ये आहे,
देवाकडे सामर्थ्य आहे, देवाची भक्ती आहे,
देव चांगला दिवस सुरू करतो.
--गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे
सर्व देवांचे नाव मौल्यवान आहे.
--सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

जसे पावसाने पृथ्वीला आशीर्वाद दिला
त्याचप्रमाणे भगवान गणेश तुम्हाला आशीर्वाद देतील.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा !

मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
–गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छI.


एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात्
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात
आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा.

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते, गणपती बाप्पा मोरया
–गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

--अमित गुप्ता
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया न्यूज.इन)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३१.०८.२०२२-बुधवार.