प्रदीप पोवार-बलात्काराची बातमी-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:36:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "प्रदीप पोवार"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री प्रदीप एस पोवार, यांच्या ब्लॉग मधील "त्याचं काय खरं नाही, थोडं इकडचं थोडं तिकडचं... " या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बलात्काराची बातमी"

                      "बलात्काराची बातमी"-लेख क्रमांक-2--
                     ---------------------------------

     मूळ विषय म्हणजे कोल्हापूरचे सध्याचे "चालू प्रकरण"- एका पोलिसाने एका मुलगीचा विनयभंग केला.

             आता या विषयाचे विविध पदर आहेत.--

१)  एके रात्री एक मुलगी (अविवाहीत) आपल्या एका विवाहीत मित्राबरोबर जेवायला म्हणून हॉटेलात गेली होती आणि तेथून परत आल्यावर साधारण रात्री दहाच्या सुमारास विद्यापिठाजवळच्या रस्त्यावर कारमध्येच त्यांचे कांहीतरी सुरु होते.
२) तेथून जात असताना एक पोलिसाच्या मनात शंका आली की रात्रीच्या वेळी कारमध्ये कांहीतरी सुरु आहे. आपल्या ड्यूटीची आठवण होऊन त्याने त्यांना दरडावून विचारणा केली.
३) या प्रकरणाची वाच्यता न करण्याच्या बोलीवर त्या पोलिसाने त्या विवाहीत तरुणाकडून अंगठी आणि त्या मुलीकडून सोन्याची चेन काढून घेतली.
४) त्यानंतर मला दसरा चौकात सोड अशी गळ घालून त्या पोलिसाने त्यामुलगीच्या सोबत तिच्या स्कुटरवरुन प्रवास केला. दरम्याने त्याने तिच्याशी अश्लिल चाळेही केले.  त्यानंतरही त्या मुलीच्या मोबाईलवर फोनकरुन लॉजवर येण्यास सांगून शरीरसुखाची मागणी केली.
५) घडल्या प्रकारानंतर इतर पोलिसांमध्ये कुजबूज सुरु झाली. त्यावेळी कार्यरत पोलिसप्रमुखांच्या कानावर ही कुजबुज पोहताच त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत त्या पोलिसाला निलंबीत केले. (यापुर्वी महिला पोलिस लैंगिक शोषणाचा इतिहास आहेच).
६) कुजबूज वाढता वाढता हे प्रकरण कालांतराने एका वॄत्तपत्रात छापून आले.  एका वृत्तपत्रात छापून आल्यावर सर्वांनाच छापणे भाग पडले. तरीही पहिल्या दिवशी कोणाचेही नाव उघड केले नव्हते. दुस-या दिवशी तो पोलिस कागल तालुक्यातील आहे व ती मुलगी पोलिसकन्या आहे हे उघड केले. तिस-या दिवशी त्या पोलिसाचे नाव जाहीर केले. पण इतक्या दिवसांनीही त्या पोलिसावर विनयभंगाचा अथवा बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.
७) नंतर जिल्हा पोलिसपदाचा कार्यभार स्विकारलेल्या प्रधानसाहेब यांनी त्या मुलीचे व त्या विवाहीत तरुणाचे समुपदेशन करुन विनयभंगाचा गुन्हा नोंद केला.
८) त्या पोलिसाचे नाव उघड झाले तेव्हा कळले की त्याच तरुणाने पुर्वी एका महिलेवर बलात्कार केला होता व प्रकरण अंगलट येणार असे वाटताच तिच्याशी विवाह केला होता.
९) त्याच्या डोक्यावर मंत्र्याचा वरदहस्त असल्यामुळेच त्याचे नाव इतके दिवस बाहेर येत नव्हते असे कळते.

--प्रदीप एस पोवार
(Wednesday, December 19, 2012)
--------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-प्रदीप एस पोवार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.