मनोगते-ग्रीक भाषा--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:44:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "मनोगते"
                                       ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री निखिल बेल्लारीकर, यांच्या "मनोगते" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ग्रीक भाषा"

                                ग्रीक भाषा--लेख क्रमांक-१--
                               ------------------------

     काही शतकांपासून ग्रीक भाषा शिकण्याची इच्छा मनात घर करून राहिली होती. तसे पाहिले तर काय माहिती होते ग्रीस बद्दल? भूमध्य समुद्रातील बेटांचा एक विस्कळीत समूह आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे उगमस्थान इतकीच ओळख होती आतापर्यंत. गेलाबाजार पायथागोरास आणि इरातोस्थेनीस यांची प्रमेये आणि अलेक्झाण्डरच्या स्वार्या आणि अजून काही तुरळक नावे वगळता काही परिचय नव्हता. चीनी लोकांसारखीच विचित्र वाटणारी यांची नावे मात्र का कुणास ठाऊक अशी एखादा कठीण श्लोक म्हटल्यासारखी वाटायची . नंतर मग सुरेश मथुरे यांचे " प्राचीन ग्रीसमधील वैज्ञानिक शोध" हे किंवा अशाच शीर्षकाचे लहानसे पुस्तक वाचले तेव्हापासून या लोकांशी थोडा थोडा परिचय झाला आणि मीदेखील एक अथीनियन झालो . मग अथेन्स म्हटले की कुठे आक्रोपोलीसवर पेरीक्लेसची राजकारणावर भाषणे चालू आहेत, तर कुठे अरिस्टोटल लोकांना तर्कशास्त्राचे नियम शिकवता शिकवता लिसियममधून शिष्यमंडळींसोबत फेरफटका मारतोय , तर दुसरीकडे युरीपायडीसची नाटके बघायला तोबा गर्दी जमलीय, तर बाजूला फिदिआस आणि प्राखीतेलेस हे शिल्पी पार्थेनोन मधील मूर्ती घडविण्यात मग्न आहेत, अशी चित्रे आपसूकच डोळ्यांसमोर येऊ लागली.

     आणि वंगदेशात आल्याबरोबर "यावनी भाषा" शिकण्याचा हा मनोदय पुरा झाला तो किक्लोस नामक एका ग्रीक क्लबच्या द्वारे . किक्लोस क्लब ही अशी एकमेवाद्वितीय संस्था आहे, की तिच्याबद्दल एक स्वतंत्र आर्टिकल लिहिणेच अधिक प्रशस्त होईल. असो. आणि हळूहळू जसा या भाषेशी परिचय झाला, तसे "It sounds greek to me" या उक्तीमागील इंगित ध्यानी आले. अक्षरांच्या बाबतीत जास्त त्रास नाहीये, कारण फिजिक्स आणि इतर बऱ्याच ठिकाणी ग्रीक अक्षरे ही चिन्हे म्हणून वापरली जातात. एकूण २४ अक्षरे आहेत . अल्फा म्हणजे इंग्लिश a हे पाहिले, बीटा म्हणजे (जवळ जवळ ) इंग्लिश b हे दुसरे तर ओमेगा म्हणजे इंग्लिश ओ हे शेवटचे अक्षर आहे.अक्षरांना "अल्फाबेट" ही संज्ञा वरील नावांवरूनच आलेली आहे. या भाषेला अक्षरे दिली ती फिनिशियन लोकांनी. कमीतकमी गेली ३००० वर्षे तरी ग्रीक भाषा अस्तित्वात असल्याचे लिखित पुरावे सापडतात. युरोप खंडातील २ सर्वात प्राचीन भाषा म्हणजे ग्रीक आणि लातिन. संस्कृतबरोबर मिळून या भाषा इंडो-युरोपियन भाषाकुलाच्या ३ खापरपणज्या आहेत.

     ग्रीकची शब्दसंपदा भारतीय कानांना प्रथम तरी एकदम वेगळी आणि म्हणूनच कर्णकर्कश वाटू शकते. काही शब्द पाहून मात्र संस्कृत ही तिची दूरची नातलग असल्याचे लक्षात येते. जसे की संस्कृतमध्ये पाणी = नीर आणि ग्रीकमध्ये पाणी= नेरो, भांडे = पोतीरी (पात्रम् ) , केन्द्र=केन्द्रो. बाप=पातेरास( पिता, पितृ ), आई= मातेरास(माता, मातृ) अशी अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील. पण इंग्लिश मधील इतके शब्द ग्रीक आहेत. की त्यांची गणना करणेच शक्य नाही. एक नामवंत ग्रीक अर्थशास्त्रज्ञ खेनोफोन जोलोतास( Xenophon zolotas) याचे १९५७ सालचे हे भाषण ह्याचा नमुना म्हणून नेहमी वापरले जाते:

--निखिल बेल्लारीकर
(एप्रिल 30, 2010)
------------------

                       (साभार आणि सौजन्य-मनोगते.वर्डप्रेस.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ----------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.