थोडस हटके !!!!!-दुधवाल्याची गाड़ी

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 09:14:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "थोडस हटके !!!!!"
                                    -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्रीमती स्वप्ना सप्रे, यांच्या "थोडस हटके !!!!!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दुधवाल्याची गाड़ी"

                              दुधवाल्याची गाड़ी--
                             ----------------

     माझी कॉलेज पासूनची वाईट सवय म्हणजे सगळ्या गोष्टीना काही ना काही नाव ठेवायची आणि त्याच नावाने त्या वस्तुला किवा त्या व्यक्तीला समबोधयाचे म्हणजे काम नीट न येनारयाना क्याक(quack),गोलमटोल लोकाना गणपति, वगैरे वगैरे .पण यामुळे अनेक गैरसमज होउन झालेला लोचा म्हणजे हा किस्सा।

     बुलेट नावाची जी गाड़ी आहे त्याला मी "दुधवाल्याची गाड़ी " म्हणते .अशीच एक गाड़ी आमच्या सोसयटित आहे। एकदा माझी मैत्रिण आणि मी रात्रि शतपावली करत होतो.आमच्या सोबत एक काकू पण होत्या.तेवढ्यात ही गाड़ी आली आणि मी म्हणाले "दुधावाल्याची गाड़ी " तेवढ्यात माझी मैत्रिण म्हणाली "दूधवाला काय हेडफोन घालून येतो काय ?" आणि आम्ही जोरात हसलो।

     आमच्या बरोबर असलेल्या काकू हे ऐकत होत्या .त्या घरी ज्याला निघाल्या.आणि जाता जाता म्हणल्या "चला आमचा दूधवाला आला " आणि त्या गेल्या।
त्या अस म्हटल्यावर आम्ही तिन ताड़ उडालोच .पुढचे काही क्षण आम्हाला समजलेच नाही पण लगेचच आम्हाला कळले की त्या गाडीवर आलेला माणूस म्हणजे त्यांचा मुलगा होता !!!!!!

     त्या काकुनेही ते हसत हसत घेतले म्हणुन तेव्हा वाचले !!!!!!!
आता पुढे परत अश्या लोच्याच्या प्रसंगाची वाट बघतीये। त्यावर लेख लिहिण्यासाठी !!!!!!!

--स्वप्ना
(Wednesday, 4 February 2009)
-----------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-स्वप्ना-सप्रे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.