मैत्रेय-१९६४-त्याची गोष्ट-अ

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:25:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मैत्रेय-१९६४"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री देवेंद्र मराठे, यांच्या "मैत्रेय-१९६४" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "त्याची गोष्ट"

                                        त्याची गोष्ट--अ
                                       --------------

     तो...........
     कालपासून बरेच वेळा सेलकडे हात गेला.काय करावं तेच कळत नव्हत.अशी द्विधा मनस्थीती का बर व्हावी याच कारण खरच कळत नव्हत की समजुन उमजुन मन सत्य नाकारत होत ?. सत्याला समोर जायच धाडस होत नव्हत हेच खरं.
गेल्या काही दिवसन पासुन सगळ्याच गोष्टी चुकत होत्या.पण नक्की काय चुकत होत तेच कळत नव्हत त्यामुळे होणारी चिडचिड मित्रांना आणि विशेषत: घरातल्या पण सर्वानां जाणवत होती. काही थोडही मनविरुध्द झाल की संताप यायचा आणि त्याची झळ समोरच्याला बसत होती. असे किती जवळचे त्यामुळे दु्खावले हेही कळल नाही.
पण शेवटी कुठेतरी हे सगळ संपवायला हवच होत.मनाचा हीय्या करुन नंबर लावला. सेलवर तिच ओळखीची ट्युन वाजत होती.माझ्या खुप आवडीची, जगजीतसिंगची जो तिच्याही आवडीचा होता. पण आज जगजीतसिंगचा मखमली आवाज कानातुन मनात उतरायला तयारच नव्हता. त्यालाही कळली असावी माझी मनस्थीती बहुदा.
कॉल डिसकनेक्ट होतो की काय अस वाटत असतानाच........

"हॅलो " असा आवाज आला.
क्षणभर हा भास की सत्य तेच कळल नाही. पण सवईन उत्तर दिल गेलं
"मी बोलतोय"
ती : बोल ना?
नेहमीचाच स्वर,शांत आणि निर्विकार... इतर वेळी अस तिव्रतेन जाणवल नसत कदाचीत..

     पण आज मात्र सगळच जाणवत होत....प्रत्येक श्वास आणि निश्वास " आज भेटुया"
ती : का रे , काही विशेष ?
थोडासा तडकलोच......
"काही विशेष असेल तरच भेटायच का?"
ती : तस नाही रे
नेहमीचीच लकब.... आपल काही चुकलय अस हीला का बर वाटत नाही
की माझच मन चुकीचा विचार करतय...... कोण जाणे
"मग भेटुया,संध्याकाळी"
ती : नेहमीच्या ठिकाणी ,संध्याकाळी ६ वाजता भेटूया
घड्याळाचा काटा ६.३० वाजले दाखवत होता. तिचा मात्र पत्ता नाही.

      ७ वाजता एकदाच आगमन झाल.
खात्री होतीच पण तरीही निरखुन पाहिल.उशिर झालाय याची चेहरयावर जाणिव नाही... नेहमी प्रमाणेच की मी वाट पाहिनच याचा विश्वास
(ही नेहमीच अस मला गृहीत धरते की आजच......)
मला वाटल, आलीय एकदाची तर किमान ती सुरुवात तरी करेल .....
"कशी आहेस"
ती : बरी आहे.
ती : कशाला भेटायला बोलवलस.. गडबडीत
(आश्चर्य........... आज एकदम मुद्दावर ... हिच्या स्वभावाशी आगदीच विसंगत वागतेय)
"भेटावस वाट्ल"
ती : खरच, हेच कारण आहे.
"दुसर काय असेल"
" आपल्याला भेटायला कारण कधि पासुन लागायला लागल"
वाटल होत बया काही बोलेल
पण ठिम्म... उशिरा आल्याची खंत पण नाही. काय समजते स्व:ताला.
मग मात्र माझा संयम सुटला. खुप काही बोललो.. आठवत नाही काहिच....... खर म्हणजे त्याची आता गरजच नाही.
बोलता बोलता लक्षात आल...... बयेच माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही.
(आजच की नेहमी प्रमाणे........)
पण नजर मात्र माझा चेहरा न्याहळत होती ....
(काय पाहत होती बया ?)
मग टेप अचानक तुटुन रंगलेल गाण बंद पडाव तस गप्पगार झालो.
बयोची नजर मात्र तशिच....एकटक खिळलेली
काय पाह्त होती......... काहिच उमजलं नाही.
थोड्या वेळ असाचं गेला... मला तिचं ते पाहण आवडत होत पण ते त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ करत होत.
एकदाचि ती भानावर आली.
ती : झाल बोलुन....

--देवेंद्र मराठे
(७ जून, २००९)
--------------

                 (साभार आणि सौजन्य-मैत्रेय-१९६४.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.