काय वाटेल ते…-अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:23:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "काय वाटेल ते..."
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री महेंद्र कुलकर्णी "काय वाटेल ते..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अंतरंगातले मित्र.."

                             अंतरंगातले मित्र..--लेख क्रमांक-१--
                            ------------------------------

     काही लोकं भेटतात, आणि एकदम जवळचे मित्र कधी होऊन जातात तेच कळत नाही. मैत्री होण्यासाठी रोज भेट होणे किंवा रोज फोनवर गप्पा झाल्याच पाहिजे असं नाही. एखादी लहानशी भेट पण पुरेशी ठरते. कामाच्या संदर्भात मध्यंतरी आसामला आणि मेघालयाला गेलो होतो.

     माझी कलकत्ता गौहाती फ्लाईट दुपारची होती . पण काही कारणामुळे रिशेड्य़ुल होऊन संध्याकाळी निघाली. रात्री साधारणपणे ९ वाजता गौहाती ला पोहोचलो. एअर पोर्टला मनोज ( डिलर) आला होता. बाहेर हातामधे फुलांचा गुच्छ घेउन उभा. मला तर लाजल्या सारखं झालं.. असा फुलांचा गुच्छ मला फक्त सेंड ऑफ आणि स्वतःच्या लग्नात मिळाला होता.

     मनोज! साधारण पणे ३५ वय असेल, तोंडात कलकत्ता पानाचा तोबरा भरलेला, गोरा रंग, आणि लक्षात रहाणारी गोष्ट म्हणजे हसतमुख चेहेरा. हा माणुस अगदी कायम हसत रहायचा. नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही हॉटेल नंदन ला रवाना झालो.

     रुमवर पोहोचल्यावर गप्पा सुरू झाल्या . माझी आणि मनोज ची ही काही तशी पहिली भेट नव्हती. दर वर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला किंवा डीलर मिट ला भेट व्हायची. पण इतक्या गडबडीत  वैयक्तिक संबंध तयार झाले  नव्हते.  खरं तर मी वेस्टर्न रीजन चा माणुस, पण केवळ माझा कलकत्याचा काउंटर पार्ट सुटीवर होता , आणि  कामाची अर्जन्सी होती ,म्हणून मला तिथे जावं लागलं.

     ह्या माणसाची  वागणूक  खूप सोज्वळ आणि कल्चर्ड ! अगदी जाणवण्या इतकं  ..  रॉयल चॅलेंज बरोबर गप्पा सुरु झाल्या. म्हंटलं, मनोज भाई, तुम्ही इथे आसाम मधे कधी पासून आलात?

--महेंद्र कुलकर्णी
(January 31, 2009)
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-काय वाटेल ते.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.