सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...-वेळेचे नियोजन--लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 04, 2022, 09:36:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                 "सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची..."
                ------------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल तेलंग्रे "सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची..."या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वेळेचे नियोजन"

                         वेळेचे नियोजन--लेख क्रमांक-2--
                        ----------------------------

     दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कामांची आपल्या पुढ्यात रोज रेलचेल असते. यातील कुठले काम तुम्ही पहिले निवडता व कुठले त्यानंतर, यावर पुढील परिणाम अवलंबून असतात, या परिणामांची परिणीती प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे असते. तेव्हा याबाबतीत काळजीपूर्वक अभ्यास करण्याची गरज भासते. कॉव्हेने त्याच्या "सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" या पुस्तकात अशी दैनंदिन कामे कोणती-कोणती असतात आणि त्या कामांना निवडताना विभागणी कशी करावी यासाठी "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स" दिले आहे. १, २, ३, ४ असे चार साचे (प्रकार) असलेल्या तक्त्यात कॉव्हे कामांची विभागणी करतो. कॉव्हेच्या मते आपल्याला करावयाची दैनंदिन (किंवा निश्चित कालावधीसाठीची) कामे ही या चार प्रकारांत मोडतात. हे चार प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
१. अतिशय महत्वाची अन् तातडीची कामे
२. महत्वाची पण तातडीची नसलेली कामे
३. महत्वाची नसलेली पण तातडीची कामे
४. महत्वाची अन् तातडीची नसलेली कामे

     या "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"चे स्वरुप खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल,

     तक्ता १: कॉव्हेचे "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"

तातडीचे असलेले
तातडीचे नसलेले
महत्वाचे
असलेले   १
⟹   २

महत्वाचे
नसलेले   ३
⟹   ४

     याच तक्त्याला एका हाताशी धरुन मी खालील माइंड मॅप बनवला आहे. या माइंडमॅपमध्ये वेळेचे नियोजन करताना मला ज्ञात असलेल्या बहुतेक कामांचे चार प्रकारांत वर्गीकरण केले असून प्रत्येक प्रकारातील कामे उरकल्यानंतर त्यांचे काय परिणाम होऊ शकतात/होतात, याची माझ्यापरीने मीमांसा केली आहे. कॉव्हेच्या मतानुसार—जर सर्वकाही सुरळीत राखायचे असेल तर ही कामे अनुक्रमे प्रकार १, त्यानंतर २, त्यानंतर ३ आणि वेळ असलाच तेव्हा शेवटी प्रकार ४ यानुसार पार पाडावीत; असा क्रम अवलंबण्याने जीवनात मानसिक, आर्थिक व प्रपंचिक समतोलत्व राखले जाऊन लक्ष्यित उद्दिष्टांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

     या माइंडमॅपची संक्षिप्त स्वरुपातील रुपरेषा खालीलप्रमाणे आहे; या रुपरेषेच्या आधारे कामांची विभागणी आणि त्यांचे परिणाम—या गोष्टींचे आकलन होण्यास मदत होईल. प्रत्येक प्रकारातील कामांचे स्वरुप व त्यांच्या परिणामांचे स्वरुप—यावर बरेच काही लिहिता येईल, पण लेखाचे समतोलत्व (!) राखण्यासाठी तूर्तास तत्सम् खंड मी वगळण्याचा निर्णय घेत आहे, तरीही माइंड मॅपमधील वर्गवारी बद्दल काही शंका उद्‍भवल्यास त्यावर आपण नक्कीच चर्चा करु.

--विशाल तेलंग्रे
(रविवार, २ जानेवारी, २०११)
-------------------------

                (साभार आणि सौजन्य-विशाल तेलंग्रे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.