मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-62

Started by Atul Kaviraje, September 05, 2022, 07:55:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-62
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --जगात  आई-मुलाच्या  प्रेमाला  कशाचीही  सर  येणार  नाही . अतिशय  निर्वाज्य , निखळ , निःस्वार्थी  असं  हे  प्रेम  म्हणजे  केवळ  अशक्यच  असतं . आई  आणि  मुलांत  एक  घट्ट  नातं  निर्माण  झालेलं  असतं , आईने  आपल्या  बाळाला  उदरात  नऊ  महिने बाळगून  जन्म  दिलेला  असतो . त्यांची  न  तुटणारी  एक  कायम  नाळ  तयार  झालेली  असते . त्या  दोघांमध्ये  एक  असं  बंधन  निर्माण  झालेलं  असतं , कि  जे  तुटतI  तुटत  नाही . किंवा  ते  नातं  कुणीही  तोडू  शकत  नाही . जे  अतूट  असतं , घनिष्ट  असतं , घन  असतं . आई  शिवाय  मूल  राहू  शकत  नाही , आणि  मुलांशिवाय  आई . दोघांचीही  ताटातूट , फारकत  झालेली  दोघांनाही  असह्य  होते , सहन  होत  नाही .

     या  चारोळीतून  एक  महत्त्वाचा  संदेश  हा  नवं -चारोळीकार  देऊ  पाहतोय , की  मुलांनो , कितीही  मोठे  झालात , कितीही  शिकलात , कितीही  प्रतिष्टीत  झालात , तरी  आपल्या आईला  कधीही  विसरू  नका . जिने  तुमच्यासाठी  कष्ट  उपसून  तुम्हाला  मोठं  केलं , नावारूपास  आणलं , समाजात  तुम्हाला  नवं  स्थान  मिळवून  दिलं , त्या  आईला  तुम्ही  कधीही  विसरू  नका . जी  आई  तुमच्या  भल्यासाठी  राब-राब  राबली , तिच्या  दुधाचे   उपकार , ऋण  तुम्ही  कधीही  विसरू  नका . तिच्या  दुधाला  जागा , हेच  तुमचे  खरे  कर्तव्य , आईप्रति  निष्ठा  दाखविण्याची  हीच   तुमची  एक  खरी  संधी  आहे . ती  तुम्ही  कधीच  व्यर्थ  दवडू  नका . काय  वाटेल  ते  झालं  तरी  आईला  तुम्ही  विन्मुख  होऊ  नका , तिचे  तुम्ही  शेवटपर्यंत  उतराई  राहा , ऋणी  राहा .

     त्या  मुलांना  विचारा , जे  अगदी  अल्प  काळातच , आपल्या  लहानपणीच  आईच्या  ममतेला  मुकलेत . त्या  अभागी  बालकांना  विचारा , की  जन्माला  येतायेताच  त्यांची  आई  त्यांना  या  जगातून  सोडून  गेली  होती . त्या  हतभागी  लेकरांना  विचारा , की  त्यांच्या  आईचे  त्यांच्या  बालपणीच  दुर्धर  आजाराने  निधन  झाले  होते . यापुढे  त्यांनी  कधीच  आपल्या  आईला  पहिले  नाही . आईची  ममता , मातृत्त्व  हे  त्यांनी कधीच  अनुभवले  नाही . आईच्या  कुशीची  प्रेमळ ऊब  त्यांनी  कधीही   घेतली  नाही . तिचा  प्रेमळ  हात  त्यांच्यावरून  कधीही  फिरला  नाही . अशी  दुर्दैवी  मुलं  आजही  आपल्या  समाजात  आहेत , की  ज्यांना  आईच  प्रेम  कधीच  मिळालं  नाही . ती  आईविनाच  मोठी  झाली . अगदी  लहानपणीच  त्यांची  आई  त्यांना पोरकं  करून  देवाघरी  निघून  गेली . त्यांनी  आईचा  आवाज  कधीच  ऐकला  नाही . नवं-चारोळीकार  व्यथित , दुःखी  होऊन  म्हणतोय , की  जगात  काही  मिळालं  नाही  तरी  चालेल , परंतु  आईचा  प्रेमळ  स्पर्श , उबदार  हात  लेकरांच्या  अंगावरून  मात्र  फिरावयासच  हवा . त्यातच  ती  मुले  स्वतःला  धन्य  समजतात . आई  नाही  तर  काही  नाही . म्हणतात  ना  "स्वामी  तिन्ही  जगाचा , आईविना  भिकारी".

===========
आईच महत्त्व
त्यालाच कळतं,
लहानपाणीच जे मुल
आईच्या प्रेमाला मुकतं.
===========

--नवं-चारोळीकार
-----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विचार.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2022-सोमवार.