०९-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 11:09:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०९.२०२२-शुक्रवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०९-सप्टेंबर-दिनविशेष"
                                  ----------------------

-: दिनविशेष :-
०९ सप्टेंबर
ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००९
दुबई मेट्रो
ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी 'दुबई मेट्रो'चे उद्‍घाटन झाले.
२००१
व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित 'मॉन्सून वेडींग' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'गोल्डन लायन' पुरस्कार मिळाला.
१९९७
सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा 'ग्रँडमास्टर' किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.
१९९१
ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९०
श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
१९८५
मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.
१९४५
दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
१९३९
माणूस
मुंबईच्या 'सेंट्रल' सिनेमामधे 'प्रभात'चा 'माणूस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.
१८५०
कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.
१८३९
जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.
१५४३
नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
   -----------------------------
१९५०
श्रीधर फडके
श्रीधर फडके – संगीतकार
१९४१
अबिद अली
सईद अबिद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू
१९०९
लीला चिटणीस
लीला (नगरकर) चिटणीस – अभिनेत्री
(मृत्यू: १४ जुलै २००३ - डॅनबरी, कनेक्टिकट, यू. एस. ए.)
१९१०
नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती
(मृत्यू: २६ मार्च १९९७)
१८९०
कर्नल सँडर्स – 'केंटुकी फ्राईड चिकन' चे संस्थापक
(मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)
१८५०
भारतेन्दु हरिश्चंद्र
१९७६ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट
भारतेन्दु हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात 'भारतेन्दु काळ' म्हणून ओळखला जातो.
(मृत्यू: ६ जानेवारी १८८५)
१८२८
लिओ टॉलस्टॉय
(२३ मे १९०८)
लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक
(मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
वर्गिस कुरियन
वर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील 'धवल क्रांती'चे (Operation Flood) जनक, 'अमूल'चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते. 'I too had a dream' हे त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ - कोहिकोड, केरळ)
२०१०
वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
(जन्म: ९ मे १९२८)
२००१
अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या
(जन्म: २ सप्टेंबर १९५३)
१९९७
आर. एस. भट – 'युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया'चे पहिले अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)
१९९४
सत्यभामाबाई पंढरपूरकर – लावणीसम्राज्ञी
(जन्म: ? ? ????)
१९७६
माओ त्से तुंग
माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते
(जन्म: २६ डिसेंबर १८९३)
१९६०
जिगर मोरादाबादी
अली सिकंदर ऊर्फ 'जिगर मोरादाबादी' – उर्दू कवी व शायर
(जन्म: ६ एप्रिल १८९०)
१९५२
किशोरीलाल मशरुवाला
किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ, लेखक, चरित्रकार व भाषांतरकार. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते 'हरिजन'चे संपादक होते.
(जन्म: ५ ऑक्टोबर १८९०)
१४३८
एडवर्ड
एडवर्ड – पोर्तुगालचा राजा
(१४ ऑगस्ट १४३३ ते ९ सप्टेंबर १४३८)
(जन्म: ३१ आक्टोबर १३९१)
=========================================
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.