मराठी जंक्शन-श्रेयस तळपदे स्मॉल स्क्रीनवर

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:15:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मराठी जंक्शन"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मराठी जंक्शन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "श्रेयस तळपदे स्मॉल स्क्रीनवर"

                           श्रेयस तळपदे स्मॉल स्क्रीनवर--
                          --------------------------

     बॉलिवुडमधून श्रेयसला खोऱ्याने ऑफर्स आहेत. तरी एका शोमधून स्मॉल स्क्रीनवर येत इथली दुसरी इनिंग खेळण्यासाठी तो पुन्हा सज्ज झालाय.

     बॉलिवुडमधले मोठमोठे सेलिब्रेटी टीव्हीवर येण्याचा ट्रेण्ड असताना आता श्रेयसही पुन्हा एकदा टीव्हीवरून आपल्यासमोर येणार आहे. 'स्टार प्लस'वर लवकरच सुरू होणाऱ्या कॉमेडी का महामुकाबला या शोमध्ये श्रेयस तळपदे, रविना टंडन, अर्शद वारसी आणि शेखर सुमन हे चार सेलिब्रेटी आमनेसामने उभे ठाकतील. हे सेलिब्रिटीज प्रत्येकी चार मेम्बर्सची टीम लीड करत विनोदाचं स्किल प्रेक्षकांसमोर पेश करणार आहेत. कॉमेडियन्स आणि सेलिब्रेटींचा या टीममध्ये समावेश असेल.

     आपल्या शोला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत म्हणून सेलिब्रेटी आणि नवीन फॉरमॅट आणण्याची चढाओढ सगळ्याच चॅनल्समध्ये लागलेली दिसते. लाफ्टर चॅलेंज आणि सध्या सोनी टीव्हीवर सुरू असणाऱ्या 'कॉमेडी सर्कस' या शोजमधून प्रेक्षकांचं हमखास मनोरंजन होतंय. त्यातूनच कदाचित स्टार प्लसला ही आयडिया क्लिक झाली असल्याची चर्चा आहे.

     ' दामिनी', 'आभाळमाया' अशा अनेक सीरिअल्समधून श्रेयसने मराठी प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. 'युनिट ९' 'एक होता राजा' या त्याच्या शेवटच्या सीरिअल्स. नागेश कुकुनूरचा 'इक्बाल' हा हिंदी चित्रपट केल्यानंतर त्याच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. 'ओम शांती ओम'नंतर तर तो बॉलिवुडमधला स्टार बनला. सिनेइण्डस्ट्रीतली जोरदार इनिंग सुरू झाल्यानंतर टीव्हीवरून त्याने एक्झिट घेतली. या नव्या शोबद्दल चॅनल आणि श्रेयसने सध्या तरी मौन बाळगलं आहे.

--मराठी जंक्शन
(MONDAY, FEBRUARY 28, 2011)
------------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मराठी जंक्शन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.