प्रसाद मराठे-The Next Sherlock Holmes

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:23:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "प्रसाद मराठे"
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री प्रसाद मराठे यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "The Next Sherlock Holmes"

                         The Next Sherlock Holmes--
                        -------------------------------

     स्पर्धा जिंकून फार-फार तर आठवडाच झाला होता. दुपारी संगणकावर F1चा खेळ खेळत असताना माझा मोबाईल वाजला. नवीन नंबर होता. मी फोन उचलला. फोन एन्स्पेटर जाधव यांचा होता. हे जाधव मुंबईत कामाला. त्यांना एक गुन्हा सोडवायला माझी मदत हवी होती. मी तात्काळ होकार दिला. त्यांनी प्रकरणाबद्दल सांगायला सुरुवात केली. वडाळा पश्चिमेला श्री. शिवराज पाटील म्हणून होते. त्यांच्या घरात R१५,००,०००ची चोरी झाली होती. हे पाटील दिसायला सभ्य असले तरी त्यांच्या वरपर्यंत ओळखी होत्या. त्यामूळेच २४ तासांच्या आतच पोलीसांवर दबाव यायला सुरुवात झाली होती. याला कंटाळून जाधव यांनी मला फोन केला. त्यांना माझा नंबर वरिष्ठांनी दिला. त्यांचे बोलणे ऎकल्यावर मी त्यांना मदत करायला होकार दिला व दुसर्या दिवशी येवून घराची तपासणी करू असे सांगीतले.

     दुसर्या दिवशी दिवशी सांगितल्याप्रमाणे पाटील यांच्या घरी पोहचलो. त्यांचे घर दुसर्या मजल्यावर होते. घराला ८ फूट उंचीचे व ५ फूट रुंदीचे मजबूत लोखंडी दार होते. पण याच दाराचे लॊक उचकटले होते. हॊलमध्ये खूप पसारा होता. मी थोडे तपासल्यासरखे करून आतमध्ये गेलो. आतल्या एका खोलीत गोदरेजचा मोठा लॊकार होता. या लॊकरचे लॊक कापले होते. मी लॊकरची तपासणी केली. त्यात मला काही पुरावे सापडले. हे पुरावे पोलीसांना दिसले नव्हते.

     जाधव आणि पाटील यांच्याकडे थोडी चॊकशी करून हॊलमध्ये आलो. तिथे कुमार हवालदार होता. त्याच्याकडे बघून मला चोर सापडला. बाहेर आल्यावर एन्स्पेटर जाधव यांनी "काही सापडल का ?" म्हणून विचारल. मी सांगितल चोर सापडला. माझ्या उत्तराने ते तीन ताड उडालेच. खूष होवून श्री. जाधव यांनी चोर कोण आहे, असे विचारले. मी लगेच हवालदार कुमारकडे बोट दाखवले. हे उत्तर त्याला अनपेक्षीत होते. पोलीस असल्याने त्याने लगेच पुरावा मागितला. मी लगेच खिशातून काही लाकडची तूस काढली. या तुसांचा रंग पोलिसांच्या काठीशी मिळता-जुळता होता. आणि कुमार यांच्या काठीचा पुढचा भाग देखील कुठेतरी अडकल्यावर खेचून काढल्यावर व्हावा, तसा झाला होता. हे बघितल्यावर कुमारचा चेहरा थोडा पडला. नंतर मी एक चांदणीच्या आकाराचा एक बिल्ला काढला. हा बिल्ला पोलीसांच्या शर्टाचा असल्याचे जाधव यांनी लगेच ओळखले. मी त्यांना कुमारचा एक बिल्ला गायब असल्याचे सांगितले. आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच कुमारने लगेच चोरी कबूल केली.

     माझ्या पुराव्याने पाटील व जाधव खूष झाले. जाता जाता इ.जाधव हळूच मला म्हणाले, "परत मदत लागल्यास नक्की कळवीन व तुला काही मदत लागल्यास मला नक्की सांग."

--प्रसाद मराठे
(Friday, 15 April 2011)
--------------------------

                   (साभार आणि सौजन्य-पी.मराठे २९.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.