रविन्द्रायण-वाघोबाची मावशी-ब

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:30:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रविन्द्रायण"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री रवींद्र लाकल यांच्या "रविन्द्रायण" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वाघोबाची मावशी"

                                     वाघोबाची मावशी--
                                    ----------------

     आमच्या मनीला झालेल्या पिल्लांपैकी बरीच पिल्ले आम्ही आमच्या ओळखीच्या  लोकांना देखील दिली त्यातलंच एक पिल्लू आम्ही माझ्या वडिलांच्या  ऑफिस मधील सहकार्याला दिले .त्याला त्यांनी अगदी थाटात सांभाळले .त्याच्यासाठी त्यांनी  थर्माकोलच  छोटस घर देखील बनवल मला अजूनही आठवतंय त्यांनी तीच नामकरण 'रुबी' अस केल ती मनी थाटात नक्की राहायची पण मांसाहारी पदार्थ खाण तर सोडा ती त्याकडे पाहत देखील नसे . 

     सगळीच मांजर काही माणसांच्या सवयीची नसतात अशीच एक मनी आमच्या पैकी कोणालाच हात लाऊ देत नसे पण  ती झोपल्यावर मात्र हात लाऊ देत असे . आम्ही तिला असच झोपल्यावर हात लाऊन लाऊन तिला माणसांची सवय लावली मग पुढे चालून ती जागे पाणी देखील आमच्या जवळ येवू  लागली.

     व्यंग काही फक्त माणसातच असतात अस नाही (शारीरिक व्यंग ) ते मांजरात देखील असतात. माझ्या वडिलांनी एक मांजर आमच्या शेतातून आणली होती .ती चालताना पाय हावेत टाकून चालायल्या सारखी चालायची नंतर आमच्या लक्ष्यात आल की ती अंध होती आणि शेतात राहिल्यामुळे ती फक्त कारळ(सूर्यफुलाच्या बिया) खात असे .

     एकदा आम्ही आमच्या एका मनीला आंघोळ घातली . तर ती जरासाही विलंब न लावता लगेच मातीत लोळायला  गेली .तसं करण्यामागच तीच कारण देखील होत थंड पाण्यान ती पार गारठून गेली होती . नंतर मात्र कधीच आम्ही कुठल्या मांजराला आंघोळ घातली नाही .

     तर हे अस आहे मांजराच आणि आमच्या कुटुंबाच नात . तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या मांजरांचे  मी फक्त किस्से सांगितले पण फोटो मात्र एका ही मांजराचा टाकला   नाही. त्याच काय आहे मी बाकी कुठल्या अंधश्रद्धा  पाळत नाही पण एक अंधश्रद्धा मात्र पाळतो मी मांजराचे फोटो काढत नाही आणि काढलेच तर ते प्रसिद्ध करत नाही.

     अलीकडेच मी एका मनीचा फोटो मोबाईल मध्ये काढला तर ती पळून गेली . आम्ही  अगदी ५ -६ दिवसापूर्वीच एक खारुताई सारख्या रंगाचे मांजराचे  एक गोंडस  पिल्लू  पाळले आहे  ज्याला कोणीही बोलवण्याची गरज लागत नाही ते आपोआप जी व्यक्ती समोर दिसेल त्याच्या मांडीवर जाऊन बसते .ही मनी अजून तरी घराच्या बाहेर देखील गेली नाही म्हणून लाडाने मी तीच नाव 'ओसामा' ठेवल आहे .

     तर कसा वाटला हा माझा वाघोबाच्या  मावशी सोबतचा (आणि काका सोबतचाही) प्रवास प्रतिसादाची वाट पाहतोय .
                                                                                         
--रवींद्र लाकल   
(रविवार, ८ मे, २०११)
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-रविन्द्रायण.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
POSTED------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.