दिसामाजी काहीतरी लिहावे-संप पत्रकारांचा

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:32:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "दिसामाजी काहीतरी लिहावे"
                                --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "दिसामाजी काहीतरी लिहावे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "संप पत्रकारांचा"

                                      संप पत्रकारांचा--
                                     --------------

     सुडडॉयट्शे त्साईटुंग सगळ्या जगाची उठाठेव करणाऱ्या पत्रकारांचीही स्वतःची काही दुःखे असतात आणि त्यांनाही मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे. अर्थात इतका बाणेदारपणा आपल्या प्रगत आणि स्वाभिमानी महाराष्ट्र भूमीत दिसून यायचा नाही. जर्मनीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिथे पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी व अन्यायाच्या विरोधात संप केला आणि वर्तमानपत्राला आपली किंमत जाणवून दिली.

     म्युन्षेनमधील सुडडॉयट्शे त्साईटुंगच्या (Suddeutsche Zeitung) १५० हून अधिक पत्रकारांनी पाच मे रोजी एक दिवसाचा संप केला. जर्मन असोसिएशन ऑफ जर्नलिस्ट्सने (डॉयट्शर युर्टनलिस्टेन फरबाण्ड– डीजेव्ही) संपाची हाक दिली होती.

     वार्ताहर, उपसंपादक आणि छपाई कर्मचारी संपावर गेल्यामुळे वर्तमानपत्राच्या कार्यालयात केवळ वरिष्ठ संपादकीय कर्मचारी उरले होते. त्याचा परिणाम असा झाला, की सुडडॉयट्शे त्साईटुंगचा अंक त्यादिवशी नेहमीपेक्षा छोट्या आकाराचा आणि मुख्यतः वृत्तसंस्थेच्या बातम्यांनी भरलेला असा काढावा लागला. अन्य दिवसांपेक्षा कमी ताज्या बातम्या असलेला आणि वेगळ्या स्वरूपाचा अंक छापावा लागत असल्याची सूचनाच मुळी वर्तमानपत्राला छापावी लागली.

     वृत्तपत्राची मालक संस्था सुडडॉयट्शे त्साईटुंग जीएमबीएचने पत्रकारांच्या वेतनात कपात करून त्यांचे कामाचे तास वाढविल्यामुळे पत्रकार नाराज आहेत. जर्मनीतील प्रथेप्रमाणे या पत्रकारांना वर्षभरात बारा महिन्यांऐवजी पावणे चौदा महिन्यांचा पगार मिळतो. आपल्याकडील दिवाळीच्या बोनसप्रमाणे हा अतिरिक्त पैसा मिळतो आणि त्याला नावही वाईह्ननाख्ट्सगेल्ड म्हणजे नाताळाचा पैसा असेच आहे.

     मालक संस्थेच्या योजनेप्रमाणे ही रक्कम तेरा महिन्यांच्या पगाराएवढी होणार आहे. त्याचसोबत कामाचे तास दर आठवड्याला ३६.५ तासांवरून ४० तासांवर नेण्याचीही योजना आहे. त्याशिवाय नवीन भरती होणाऱ्या पत्रकारांच्या सुरवातीच्या वेतनात कपातीची योजनाही आखण्यात आली होती.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(मे 9, 2011)
-------------

                      (साभार आणि सौजन्य-देवदेश.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.