ब्रह्म चैतन्य-॥ गृहस्थाश्रम ॥

Started by Atul Kaviraje, September 11, 2022, 10:07:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "ब्रह्म चैतन्य"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "ब्रह्म चैतन्य" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "॥ गृहस्थाश्रम ॥"

                              ॥ जय श्री राम ॥
                              ॥ गृहस्थाश्रम ॥
                             ----------------

     आपल्या आईला वर्षाभरापूर्वी सांगितल्या प्रमाणे श्रीमहाराज गोंदवल्यास परत आले. गोंदवल्यात आल्यावर श्रीमहाराज रात्री मुक्कामाला गावच्या मारुती मंदिरात थांबले. पहाटे चिंतुबुवा नावाचे गृहस्थ प्रात:र्विधीसाठी गावा बाहेर चालले होते. श्रीमहाराजांनी चिंतुबुवांना हाक मारली. लहानपणीच्या दोनचार गोष्टी सांगितल्यावर  चिंतुबुवांना श्रीमहाराजांची ओळख पटली. चिंतुबुवांनी बाहेरुन आल्यावर रावतींना कळवण्याचे ठरविले. इकडे श्रीमहाराज आपल्या घरी गेले. "जय जय रघुवीर समर्थ " म्हणून आपल्या आईकडे भिक्षा मागितली. गीतामाई भिक्षा घेवून बाहेर आल्या. त्यावर श्रीमहाराजांनी त्यांना उतरंडीवर ठेवलेले दगडीतले घट्ट विरजलेले दही मागितले.( लहानपणी श्रीमहाराजांना दही फार आवडे म्हणून गीतामाई  रोज दगडीत विरजलेले दही लावीत.) गीतामाईंनी दही आणले. यावर श्रीमहाराज गीतामाईंकडे बघून नुसते हसले.त्याबरोबर गीतामाईंनी श्रीमहाराजांना ओळखले. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. बाहेर कसली गडबड चालली म्हणून रावजी बाहेर आले. श्रीमहाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. जिकडेतिकडे आनंदाचे वातावरण पसरले. गावातील सर्वजण पंतांच्या नातवाला, श्रीमहाराजांना बघायला येवू लागले. पंतांचा नातू मोठा साधु पुरुष बनून आला आहे, अशी बातमी संपूर्ण गोंदवल्यात पसरली. नऊ वर्षांनी श्रीमहाराज गोंदवल्यास परत आले होते.

--ब्रह्म चैतन्य
------------

                  (साभार आणि सौजन्य-ब्रह्म चैतन्य.वर्डप्रेस.कॉम)
                             (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2022-रविवार.