दीपक परुळेकर-फोन भूत !!!!--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:43:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दीपक परुळेकर"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "दीपक परुळेकर" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फोन भूत !!!!"

                                   फोन भूत !!!!--क्रमांक-2--
                                  -----------------------

     तिसरं राउंड सुरु झालं.. इतक्यात त्याच नंबरवरुन परत फोन आला... मी घडाळ्याकडे पाहीले. साडे नऊ वाजले होते. मी फोन उचलला.." हॅलो... हॅलो...." कुणाचाच आवाज नाही...आत मात्र पलीकडुन कसलाही आवाज येत नव्हता.. शांत !!! मी १ - २ वेळा हॅलो हॅलो बोलुन वैतागुन फोन डिसकनेक्ट केला...परत १ - २ मिनिटानी त्याच नंबरवरुन फोन... आताही तेच..कुणी बोलत नाही...मी हॅलो.... हॅलो बोलुन परत फोन ठेवला... एव्हाना बाकीचे सगळेजण माझ्याकडे बघत होते..." काय झालं रे ? कोण होतं? " तेजसने विचारले... " माहित नाहे रे, त्याच नंबरवरुन फोन आलाय... मघाशी कसले कसले आवाज येत होते... आता तर आवाजही येत नाहीत्...कोण आहे कुणास ठाउक ! ' मी वैतागुन बोललो आणि एक लार्ज सिप घेतला...मग ती स्टोरी जग्गु आणि अमेयला सांगितली... काही वेळाने परत फोन आला... मी अ‍ॅन्सर न करताच डिसकनेक्ट केला... परत फोन आला ..... मी डिस्कनेक्ट केला....असं दोन तीन वेळा झालं... मग मला थोडं वाटु लागलं की तीच असावी... ब्रेक अप झाल्यापासुन आम्ही एकमेकांशी बोललो नव्हतो... किंवा भेटलोही नव्हतो. ( पी. एस. :- मी ३ पेग डाउन आहे.) वैतागुन मी फोन स्विच्ड ऑफ केला... म्हटलं मरु दे !! नंतर बघुया... तसं माझी लव्ह स्टोरी अमेय आणि तेजसला माहित होती.. मी थोडासा अपसेट झालो...मला तिची प्रकर्षाने आठवण यायला लागली....मला अपसेट बघुन काही जणांनी मला धीर दिला... आणि ४ था पेग भरला... तेजसने मला सेल ऑन करायला सांगितले... बोलला बघुया परत फोन येतो का. मी नाय नाय करत फोन ऑन केला... काही वेळ निघुन गेला आणि परत फोन आला...." नॉट अगेन ! डॅम्न ! " म्हणुन मी फोन सोफ्यावर फेकुन दिला...फोन वाजुन वाजुन बंद झाला.. पण परत वाजायला लागला... मी उचलला...वैतागुन, रागाने ओरडलो..." हॅलो कोण आहे?? बोलत का नाही..??? " माझी जिभ अडखळत होती...

     " सोनु तु आहेस का? बोल ना ! तु बोलत का नाहीस ?? " मी बोलुन बोलुन थकलो पण समोरुन कसलाही आवाज नाही...मी फोन डिसकनेक्ट केला...
" मला वाटतं तीच आहे..अजुन कुणी नसणार आणि इतक्या रात्री अजुन कोण फोन करणार?" मी बोललो... " तीच कशावरुन ? " कुणी तरी विचारले..
" तीच असणार यार इतक्या रात्री अजुन कोण फोन करणार ? आय मीन जर दुसर्‍या कुणाला बोलायचं असतं तर त्याने ब्लँक कॉल का दिले असते?? "' ( चार पेग डाउन ) आता मला सॉलेड चढली होती..मला काही सुचत नव्हतं.. फोन येतच होते... आणि मी डिसकनेक्ट करत होतो..कारण बोलुन काहिच फायदा होत नव्हता.. त्यानंतर येणार्‍या प्रत्येक कॉलला मे किती तरी मुलींची नावं घेतली...भक्ती, पल्लवी, श्वेता, सोनु.... हे समजुन की यापैकी कुणी फोन करत असावं... सगळेजण माझ्याकडे डोळे फाडुन बघत होते...( आणि हो एक सांगायचं राहिलं मी जेव्हा जेव्हा त्या नंबरवर फोन करायचो तेव्हा तो फोन फक्त रिंग व्हायचा. कुणीही अ‍ॅन्सर करत नव्हतं त्यामुळे मी अजुन कन्फ्युझ होतो..) काही वेळाने माझ्या कन्फ्युझनची जागा भीतीने घेतली...कारण एका वर्ष झालं होतं तिला बघुन आणि तिच्याशी बोलुन. त्याकाळात तिच्याविषयी मला काहिच कळलं नव्हतं. किंबहना मी ते जाणुन घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता...आमच्यात जे काही झालं होतं ते सगळं मी मनाच्या कुठच्या तरी कोपर्‍यात गाडुन ठेवलं होतं..त्यामुळे तिचं काही बरं - वाईट तर झालं नसेल ना या विचाराने मी घाबरलो होतो...म्हणजे अ‍ॅल्कोहोलचा माझ्यावर इतका परीणाम झाला होता कि. तो फोन कॉल भुताचा किंवा एखाद्या आत्म्याचा असावा असं मला वाटत होतं.( एखद्या चित्रपटासाठी चांगला कॉन्सेप्ट आहे. नाही का? )

--दीपक परुळेकर 
(SUNDAY, NOVEMBER 1, 2009)
-----------------------------------

                (साभार आणि सौजन्य-दीपक परुळेकर.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.